काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर काँग्रेसने सुधीर तांबेंचं निलंबन केलं. आता सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण २०-२२ उमेदवारांनी अर्ज केले होते, अशी माहिती दिली आहे. ते सोमवारी (१६ जानेवारी) एबीपी माझाशी बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकूण २०-२२ लोकांनी अर्ज केले होते. त्यातील एकाला आशीर्वाद द्यावा लागेल, अधिकृत मान्यता देऊन पाठिंबा द्यावा लागेल. ती प्रक्रिया आता चालू आहे. अर्धा तासात त्याचा निर्णय होईल. याशिवाय नाशिक आणि नागपूरची काही सांगड घालायची का? हाही काही लोकांचा प्रयत्न आहे. काही वेळातच हे चित्र स्पष्ट होईल.”

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?

“शिस्तभंगाचा आणि शिस्तपालनाचा संबंध दिल्लीशी”

सत्यजीत तांबेंच्या निलंबनाच्या कारवाईच्या शक्यतेवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सुधीर तांबेंना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तिकीट दिलं होतं. त्यामुळे या शिस्तभंगाचा आणि शिस्तपालनाचा संबंध दिल्लीशी आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीला काही शिफारस करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय एआयसीसीच करेल.”

“आणखी कोणाचं निलंबन करायचं असेल तर तारिक अन्वर करतील”

“सुधीर तांबे यांच्या निलंबनाचा निर्णयही केंद्रीय शिस्तपालन समितीने घेतला होता. त्या समितीचे सचिव तारिक अन्वर आहेत. त्यांच्या सहीने सुधीर तांबेंच्या निलंबनाचं पत्र निघालं आहे. त्यामुळे आणखी कोणाचं निलंबन करायचं असेल तर त्यांच्या सहीनेच होईल,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

“सत्यजीत तांबेंच्या निलंबनाची माहिती महाराष्ट्रातून मिळणार नाही”

“सत्यजीत तांबेंच्या निलंबनाची माहिती महाराष्ट्रातून मिळणार नाही. शिफारस महाराष्ट्रातून नक्की जाईल, मात्र निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या पातळीवर होईल. सुधीर तांबेंचं निलंबन झालं आहे. आता त्यापुढे काय कारवाई करायची हा निर्णय तारिक अन्वर घेतील,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

“मविआच्या कुठल्याही एका उमेदवाराला समर्थन करावं अशी चर्चा सुरू”

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, “प्रश्न सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाचा नाही. निर्माण झालेल्या या परिस्थितीत काँग्रेस आणि महाविकासआघाडीच्या सर्व घटकपक्षांनी यातून काय मार्ग काढायचा असा आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा भाजपाच्या विचाराच्या लोकांच्या हातात ही जागा जाऊ नये आणि मविआच्या कुठल्याही एका उमेदवाराला सर्वांना समर्थन करावं, अशाप्रकारची चर्चा सुरू आहे. आता ती चर्चा संपली असेल.”

हेही वाचा : तांबे पिता-पुत्राच्या बंडानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? नाना पटोले म्हणाले, “बेईमानी करून…”

“नागपूर, नाशिक यांची एकत्रित चर्चा होऊन मार्ग निघेल”

“काही लोकांना त्यात नागपूरचा प्रश्नही उपस्थित केला. त्यामुळे नागपूर, नाशिक यांची एकत्रित चर्चा होऊन मार्ग निघेल. तसेच कोण अर्ज मागे घेत आहे आणि कोण नाही हे अर्धा तासात आपल्याला कळेल,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

Story img Loader