चकाला येथे एका खाजगी बसने धडक दिल्याने प्रीती कांबळे (२८) या महिलेचा मृत्यू झाला. अंधेरी कुर्ला रोडवरील चकाला जंक्शन येथे सकाळी साडेआठच्या सुमारास ही येथे दुर्घटना घडली.
धडक दिल्यानंतर बस चालक बससहीत घटनास्थळावरून फरार झाला होता. जखमी प्रीतीला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
अंधेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीत ठाण्याच्या चंदनवाडी भागातील रहिवाशी असून या भागातील एका विमा कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक पदावर काम करत होती. सकाळी ती होली फॅमिली चर्चसमोरील रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने आलेल्या खासगी बसने तिला धडक दिली. त्या धडकेने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडक देणारे वाहन खासगी बस असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अंधेरी पोलिसांनी अज्ञात बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आता परिसरातील खाजगी बसेसची चौकशी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा