सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अंगडिया म्हणडे खाजगी कुरियर. सोन्या चांदीचा व्यापार करणारे व्यापारी आपल्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी या आंगडियाचा वापर करतात. या कुरियर सव्‍‌र्हिसच्या माध्यमातून आंगडिया लाखो रुपये कमावतात. एक लाख रुपये पोहोचविण्याच्या मोबदल्यात आंगडिया २०० ते ८०० रुपये कमिशन म्हणून घेतात. हंगामात त्यांना मोठी मागणी असते. महाराष्ट्रातूनच आंगडियांच्या माध्यमातून दिवसाला १०० कोटी रुपयांचे व्यवहार होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हिरे व्यापारी १ लाख कोटी तर सोने चांदीचे व्यापारी ७० हजार कोटी रुपयांचे व्यवहार या आंगडियांमार्फत करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या उपनगराप्रमाणे शहरात आंगडियांचे जाळे पसरले आहे. पैशांच्या हव्यासापोटी हे आंगडिया आता हवाला ऑपरेटर बनत असल्याचे गेल्या काही घटनांवरून उघड झाले आहे.
आंगडिया म्हणजे विश्वासाचा व्यवहार. डोळे बंद करून आंगडियावर कोटय़वधी रुपयांची देवाणघेवणा केली जाते.  गेली अनेक वर्षे आंगडियांमार्फतचा हा व्यवहार सुरू आहे. कर चुकविण्यासाठी व्यापारी आंगडियांचा आधार घेतात. पण आता अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी संघटनाही आंगडियाचा वापर करु लागले आहेत. मुंबई पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अल्पेश पटेल या आंगडियाला अटक केली होती.  सट्टेबाज रमेश व्यास याच अल्पेश पटेलच्या माध्यमातून परदेशात कोटय़ावधी रुपये पाठवत होता. मुंबई सेंट्रल येथून आंगडियांच्या ट्रकमधून कोटय़ावधी रुपये जप्त करण्यात आले. हा पैसा दहशतवादी कृत्यांसाठी पाठवला जात असल्याची माहिती असल्यानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापा घातला होता. सध्यातरी तशी शक्यता नसली तरी त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
आंगडिया म्हणडे खाजगी कुरियर. सोन्या चांदीचा व्यापार करणारे व्यापारी आपल्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी या आंगडियाचा वापर करतात.  एक लाख रुपये पोहोचविण्याच्या मोबदल्यात आंगडिया २०० ते ८०० रुपये कमिशन म्हणून घेतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा