बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुंबईतील एका कर्करोग रुग्णालयाला ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. प्रियांकाने तिच्या वडिलांना कर्करोगामुळेच गमावले आहे. त्यामुळे उपनगरातील कर्करोग रुग्णालयाच्या बांधणीकरिता तिने हा निधी दिला आहे.
प्रियांकाने केवळ निधी दिला नाही, तर रुग्णालयातील कर्करोग विभागाचे उद्घाटनही तिनेच केले. या विभागाला दिवंगत डॉ. अशोक चोप्रा यांचे नाव देण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. प्रियांकाचे वडिल हयात असताना तिने “डॅडीज् लिटील गर्ल” असा टॅटोही गोंदवून घेतला होता.
प्रियांकाचा कर्करोग रुग्णालयाला ५० लाखांचा निधी
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुंबईतील एका कर्करोग रुग्णालयाला ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
First published on: 21-10-2013 at 02:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra donates rs 50 lakh to cancer hospital