बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुंबईतील एका कर्करोग रुग्णालयाला ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. प्रियांकाने तिच्या वडिलांना कर्करोगामुळेच गमावले आहे. त्यामुळे उपनगरातील कर्करोग रुग्णालयाच्या बांधणीकरिता तिने हा निधी दिला आहे.
प्रियांकाने केवळ निधी दिला नाही, तर रुग्णालयातील कर्करोग विभागाचे उद्घाटनही तिनेच केले. या विभागाला दिवंगत डॉ. अशोक चोप्रा यांचे नाव देण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. प्रियांकाचे वडिल हयात असताना तिने “डॅडीज् लिटील गर्ल” असा टॅटोही गोंदवून घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा