‘यशवंतराव चव्हाण सेंटर’मध्ये ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती स्पर्धा-२०१८’मध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांना गुरुवार, २७ डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. प्रथम विजेत्याला ९,९९९ रुपये रोख, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. तर द्वितीय पारितोषिक ६,६६६ रुपये रोख, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जाईल. विशेष पारितोषिक २,००१ रुपये रोख, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह असे आहे. नरिमन पॉइंट येथील ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’मधील रंगस्वर सभागृहात दुपारी २.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री रामदास कदम, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली.

पर्यावरणाबद्दल समाजमनात केवळ वैचारिक नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जनजागृती व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेला मुंबईसह राज्याभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असंख्य वाचकांनी, पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणस्नेही साहित्य वापरून गणेशाची केलेली आरास, सजावटीची छायाचित्रे, ‘लोकसत्ता’कडे पाठवली होती. स्पर्धेसाठी रूपाली मदन, नरेंद्र महाडिक, सुधीर शेठ आणि सुमित पाटील यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.

विजेत्यांची नावे

मुंबई विभाग

* प्रथम पारितोषिक – सचिन पाटील

*  द्वितीय पारितोषिक – सुशील पेंढारी

*  उत्तेजनार्थ – सोहम धारिया, गौरव यादव, अजय डिंगोरकर, आकाश घंटय़ाळ, अमित बाबरदेसाई, अमोल वैद्य, अनंत नमये, अनिकेत वैती, डॉ. अंशू चव्हाण, आशीष कदम, अशोक तामोरे, बाळकृष्ण तापसे, दीपक चोपडे, प्रसाद मुंढे, दिलीप पालकर, फाल्गुनी कनाणी, गिरीश शीतप, हर्षल त्रिलोकेकर, जीवन भोसले, कांची गुप्ता, केतन सोनपुरा, किरण पाटील, मकरंद देसाई, विनय पिळवलकर, नरेंद्र धनकरघरे, नीलेश किनारे, परीश पाटील, परशुराम भादवणकर, पवन कदम, प्रभाकर महागावकर, प्राजक्ता ठाकूर, प्रशांत पांगेरकर, राजू राणे, सागर तवरे, संतोष वर्टेकर, नलेश पाताडे, समीधा पटवर्धन, दत्तात्रय चिहणे, धनश्री कानडे

* कधी : गुरुवार, २७ डिसेंबर २०१८, वेळ : दुपारी २.३०

* कुठे : रंगस्वर सभागृह, ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’, नरिमन पॉइंट

Story img Loader