दोन दिवसांत निर्णय घेणार

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दहा फेऱ्या घेऊनही पालक आणि विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यामुळे अजून एक प्रवेश फेरी घेण्याचे प्रवेश समितीच्या विचाराधीन आहे. याबाबतचा अंतिम निर्णय दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने दहा प्रवेश फेऱ्या घेतल्या. मात्र त्यानंतरही प्रवेश न  मिळाल्याच्या तक्रारी विद्यार्थी  आणि पालक करीत आहेत. त्यामुळे आता पहिले सत्र संपत आले तरीही अकरावी फेरी घेण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन असल्याचे समजते. यापूर्वी ३० सप्टेंबपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते. नुकतीच घेण्यात आलेली फेरी ही शेवटची संधी असल्याची तंबीही शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दिली होती. मात्र विद्यार्थ्यांनी महाविद्यालय नाकारले, प्रवेश रद्द केले त्यानंतर प्रवेश मिळाले नाहीत असे विद्यार्थी शिक्षण विभागाकडे जात आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावे म्हणून अजून एक फेरी घेण्याची वेळ समितीवर आली आहे. याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेण्यात येईल.

Story img Loader