ललित मोदी आणि सुषमा स्वराज या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून साऱ्यांचीच चौकशी करण्याची मागणी करीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी थेट पवार यांनाच गुरुवारी लक्ष्य केले. विशेष चौकशी पथक नेमून शरद पवार यांच्यासह साऱ्यांचीच चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली. आयपीएलशी संबंधित मग काँग्रेस पक्षाचा नेता असला तरी सर्वाची चौकशी केल्यास बऱ्याच भानगडी बाहेर येतील, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.

Story img Loader