अनधिकृत बांधकामांमधील रहिवाशांना बेघर करू नका, या मागणीसाठी भाजपचे डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयावर १७ दिवसांपूर्वी सर्वपक्षीय मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या वेळी आमदार चव्हाण यांनी केलेल्या भाषणाची सविस्तर सीडी पालिका अधिकारी सादर करू शकत नसल्याने आमदार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अडचण येत असल्याची माहिती विष्णुनगर पोलिसांनी दिली.
गेल्या आठवडय़ात पालिकेचे ह प्रभाग अधिकारी लहू वाघमारे यांनी, मोर्चाच्या वेळी आमदार चव्हाण यांनी केलेले भाषण, त्यामधील प्रक्षोभक, चिथावणीखोर वाक्ये आणि पालिका अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारी भाषा याचा अहवाल विष्णुनगर पोलीस ठाण्यात सादर केला आहे.
यावेळी चव्हाण यांच्या भाषणाची सीडी पोलिसांना देण्यात आली आहे.
आमदार चव्हाण यांनी १०-१५ मिनिटे भाषण केले, सीडीमध्ये त्यापैकी फक्त सात ते आठ मिनिटाचेच भाषण रेकॉर्ड झाले आहे. चिथावणीखोर, प्रक्षोभक विधानांचा भाग सीडीतून गायब आहे.

Story img Loader