भारत निवडणूक आयोगाने ‘१६६- अंधेरी पूर्व’ या महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित केली केली आहे. या निवडणुकीकरिता दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत.दरम्यान, या निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील चुरस संपली आहे.
हेही वाचा >>>Video: गर्दीमुळे चालत्या ट्रेनमधून माय-लेक फेकले गेले; RPF च्या जवानांनी वाचवले प्राण!
अपक्ष उमेदवार फारसा प्रचार करत नाहीत. त्यामुळे या भागात निवडणुकीचे वातावरण नसल्यामुळे निवडणूक नाही असा समज रहिवाशांचा झाला असल्याची भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे. आधीच पोट निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी असतो त्यात अशी स्थिती असल्यामुळे मतदानाला किती लोक बाहेर पडतील याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्यातच विरोधी गटाकडून नोटाच्या पर्यायाचा प्रचार सुरू असल्यामुळे शिवसेनेपुढील आव्हाने अद्यापही संपलेली नाहीत.