कांजूर डम्पिंग ग्राऊण्डवर बेकायदा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविरोधात स्थानिक नागरिक आणि मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पूर्व द्रुतगती महामार्गावर ‘रास्तारोको’ केला. तसेच मंगेश सांगळेसह बऱ्याचजणांनी मुंडन करून आपला निषेध नोंदविला.
डम्पिंग ग्राऊंड बंद करावे. कचऱ्याचे विघटन करणारी कोणतीही यंत्रणा येथे नसल्याने आसपास दर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विक्रोळी, पवई, कांजूर, भांडूप आणि नाहूर येथील नागरिकांना याचा त्रास होत आहे. याविरोधात सोमवारी कन्नमवार नगर ते कांजूर डम्पिंग ग्राऊण्डपर्यंत ‘रास्ता रोको’ करीत ‘अंत्ययात्रा’ काढण्यात आली. सोबत महापलिका आणि राज्य शासनचे ‘श्राध्द’ही घालण्यात आले.
आणखी वाचा