केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या धोरणात बदल करीत प्रादेशिक भाषांना हद्दपार केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच राज्यभरातील मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, ठिकठिकाणाहून या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईत बुधवारी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने केंद्रीय लोकसेवा आयोगाविरोधात जोरदार निदर्शने करून हुतात्मा चौक दणाणून सोडला. लोकसेवा आयोगाने नव्या धोरणात फेरबदल न केल्यास महाराष्ट्रात परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्वापार चालत आलेल्या परीक्षांच्या धोरणात बदल करून भविष्यात होणाऱ्या परीक्षेत प्रादेशिक भाषेचा पर्याय काढून टाकल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’च्या बुधवारच्या अंकात ‘लोकसेवा आयोगाकडून प्रादेशिक भाषांची हकालपट्टी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने बुधवारी हुतात्मा चौकात निदर्शने केली. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
आयोगाच्या नव्या धोरणामुळे महाराष्ट्रात नेमणूक होणाऱ्या आयएएस, आयपीएस, एयएफएस, आयआरएस इत्यादी पदांवर परिष्ठ अधिकारी म्हणून अन्य प्रांतातील उमेदवारांची वर्णी मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक भाषा त्यांना अवगत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होऊ शकतात. या सर्व परिस्थितीचा विचार केल्यास पूर्वीप्रमाणे प्रादेशिक भाषेचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सध्या आयोगातर्फे केवळ मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीन केंद्रांवरच पूर्वपरीक्षा घेतल्या जातात. यामुळे अनेक उमेदवारांची गैरसोय होत असून रत्नागिरी, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आदी जिल्ह्यातही परीक्षा केंद्रे उपलब्ध करावीत, अशी मागणी गजानन कीर्तिकर यांनी केली आहे.
यावेळी गजानन कीर्तिकर, वामन भोसले, प्रदीप बोरकर, अनंत भोसले यांच्यासह २० जणांना अटक करण्यात आली.या प्रकरणी खासदार अनंत गीते आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे खासदार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत.
लोकसेवा आयोगाविरोधात राज्यभर निषेधाचा वणवा
केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या धोरणात बदल करीत प्रादेशिक भाषांना हद्दपार केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच राज्यभरातील मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, ठिकठिकाणाहून या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईत बुधवारी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने केंद्रीय लोकसेवा आयोगाविरोधात जोरदार निदर्शने करून हुतात्मा चौक दणाणून सोडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-03-2013 at 05:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against upsc in all over maharashtra