दिल्लीत अलिकडेच २३ वर्षीय मुलीवर झालेला सामुहिक बलात्कार तसेच अलिडकच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाण्यातील तरुणांनी रविवारी तलावपाळी येथे मेणबत्ती मोर्चा काढला होता.ठाण्यातील तरुणांनी पुढाकार घेऊन या मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात शहरातील ३०० हून अधिक तरुण-तरुणी विविध संदेश देणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. ‘मुलीची छेड काढताना दिसेल तर तिकडेच उत्तर द्या’ अशा प्रकारचे विविध संदेश यावेळी तरुणांनी दिले.
महिलांवरील अत्याचाराविरोधात कडक कायदा करायला हवा तसेच अशाप्रकारचे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी उपस्थित तरुणांनी केली. येथील कचराळी तलावापासून तलावपाळी पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.    

Story img Loader