असहकार आणि अहिंसक या हत्यारांचे आज काय होत आहे? ती बदलण्याची वेळ आली आहेय या हत्यारांचा वापर करणाऱ्यांना विकासविरोधी, राज्य विरोधी मानले जाते. वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करूनही काही निर्णयच होत नाहीत. अशा वेळी नवीन मार्ग काढण्याची सकारात्मक वृत्ती आंदोलन करणाऱ्यांकडे हवी, अशी अपेक्षा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘पोर्ट ट्रस्ट कामगार’ विशेषांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वातंत्र्यसैनिक आणि माजी महापौर डॉ. शांती पटेल यांनी भूषविले.
माध्यमांमध्ये बाजारीकरणाचे प्रभूत्व जाणवते. जनसामान्यांच्या जीवनाचे व त्यांच्या समस्यांचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटतच नाही. माध्यमांचे प्रभूत्व व कॉर्पोरेट जगतापासून ते सध्याच्या शिक्षणापासून व आरोग्य या सर्वच क्षेत्रात जाणवते, असे त्या पुढे म्हणाल्या.
कामगारांचा सर्वागीण विकास व्हावा, त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावे या हेतून गेली १६ वर्षे ‘पोर्ट ट्रस्ट कामगार’चा दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे. त्यामध्ये कामगारांचा सहभाग वाढत आहे.
यावेळी मुंबई पोट्र ट्रस्टचे अध्यक्ष राजीव गुप्ता, मार्मा गोवा पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त व ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस. के. शेटय़े, अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर राणे यांनी, तर आभार प्रदर्शन दत्ता खेसे यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा