वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गावर आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी केलेल्या वर्तणुकीवरून चर्चेत आलेले मुंबईतील वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. याप्रकरणी चौकशी सुरू असून, ही चौकशी पूर्ण होईपर्यंत सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. आमदारांशी बोलताना सूर्यवंशी यांची भाषा उर्मट असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
गेल्या सोमवारी सागरी सेतू मार्गावर सूर्यवंशी यांनी ठाकूर यांची गाडी अडविली होती. त्यांच्या गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांच्याकडून ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यावेळी ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यामध्ये संबंधित ठिकाणी शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर ठाकूर यांनी सूर्यवंशी यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. या प्रस्तावादिवशीच विधानभवनाच्या परिसरामध्ये ठाकूर, राम कदम, प्रदीप जैस्वाल, राजन साळवी, जयकुमार रावळ यांच्यासह इतर काही आमदारांनी सूर्यवंशी यांना मारहाण केली होती. त्यावरून पुढे या पाचही आमदारांना विधिमंडळाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले होते.
पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित
वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गावर आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी केलेल्या वर्तणुकीवरून चर्चेत आलेले मुंबईतील वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
आणखी वाचा
First published on: 25-03-2013 at 04:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psi sachin suryavanshi suspended says r r patil