मुंबई : समुद्रकिनारे, उद्यान आणि प्रार्थनास्थळांचा आसपासचा परिसर, पदपथ आदी ठिकाणी दाणे टिपणारी, मध्येच पंखांची फडफड करीत भिरभिरणारे कबुतरांचे थवे दृष्टीस पडतात. अनेक इमारतींच्या छताच्या कोनाड्यात एक विशिष्ट आवाज करीत विसावणारी कबुतरे आता नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक बनू लागली आहेत. प्राण्यांवरील भुतदयेतून कबुतरांना खाद्य उपलब्ध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, परंतु याच कबुतरांमुळे आता नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन कबुतरांविषयी जनजागृती करण्यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी’ने (बीएनएचएस) ‘जेएसडब्ल्यू’च्या सहकार्याने कबुतरांच्या वाढत्या संख्येवर जनजागृती करण्यासाठी ‘मर्सी फीडिंग: पिजन मेनेस इन अर्बन एरियाज’ हा माहितीपट तयार केला आहे. बीएनएचएस’चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत ‘जेएसडब्ल्यू’च्या संगिता जिंदाल यांच्या हस्ते मंगळवारी माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा