मुंबई : राज्य सरकारने महिलांना सर्व प्रकारच्या एसटी बसमधून प्रवास करता यावा यासाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरू केली. याद्वारे दररोज लाखो महिला एसटीतून ५० टक्के तिकीट दरात प्रवास करीत आहेत. परंतु केवळ महिलांना तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा ‘सन्मान’ही राखला जावा यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सहकार्याने ‘अक्षरा केंद्र’ने सार्वजनिक वाहतुक सेवेत महिलांच्या लैंगिक छळाच्या विरोधात ‘जागा दाखवा’ ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एसटीने ‘जागा दाखवा’ हा प्रबोधनात्मक संदेश सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा व त्यातून जनजागृती करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक बसस्थानकावर, समाज माध्यमाच्याद्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफितीद्वारे महिलांचा प्रवासादरम्यान मान राखावा, असा संदेश दिला जाणार आहे. बऱ्याचदा गर्दीचा गैरफायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे, लोकलचा प्रवास, एसटीचा प्रवास अशा ठिकाणी महिलांशी छेडछाड होते. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्या विरोधात आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना महिलांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. धाडस दाखवले पाहिजे, त्याबरोबरच अशा महिलांना सहकारी प्रवाशांनी देखील सहकार्य केले पाहिजे, असा संदेश देणाऱ्या चित्रफिती प्रत्येक बसस्थानकावर दाखवल्या जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public awareness campaign against sexual harassment of women in public transport services jaga dakhva is underway mumbai print news amy