मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून आज, रविवारी सुटीचे निमित्त साधून मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ठिकठिकाणच्या गणेश कार्यशांळामधून मूर्ती ढोल-ताशाच्या गजरात मंडपस्थळी आणल्या. त्यामुळे लालबाग, परळ, गिरगाव आदी भागांमध्ये उत्सवी वातावरण होते. 

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
High Court question Home Department and Director General of Police to take action against illegal loudspeakers at religious places mumbai news
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा
Stones pelted at hawker removal teams vehicle in G ward of Dombivli
डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Pushkar Singh Dhami
Uttarakhand : डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय
fully equipped tourist attraction in Gondia Vidarbha
नवेगावबांधमध्ये पर्यटकांसाठी सूसज्ज निवास व्यवस्था ; या आहेत सुविधा
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?

गेल्या दोन वर्षांत करोना संसर्गाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन गणेशोत्सवात आगमन-विसर्जन मिरवणुकींना परवानगी देण्यात आली नव्हती. अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र करोनाचे संकट नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

मुंबईमधील काही सार्वजनिक गणेश मंडळांनी १४ ऑगस्टपासून गणेशमूर्ती मंडपस्थळी नेण्यास सुरुवात केली. ढोल-ताशाचा गजर, गुलालाची उधळण आणि फडकणारे भगवे झेंडे यामुळे अवघे वातावरण भक्तीमय झाले होते.

बहुसंख्य गणेशमूर्ती

२८ ऑगस्ट रोजी मंडपस्थळी रवाना झाल्या आहेत. गणेशोत्सव ३१ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. कार्यशाळेतील उर्वरित गणेशमूर्ती या दिवशी मंडपस्थळी रवाना होतील.  – रेश्मा खातू, मूर्तिकार

रविवारी सुटीचे निमित्त साधून मुंबईतील बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांनी ठिकठिकाणच्या गणेश कार्यशांळामधून मूर्ती  मंडपस्थळी आणल्या.

Story img Loader