हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून आज, रविवारी सुटीचे निमित्त साधून मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ठिकठिकाणच्या गणेश कार्यशांळामधून मूर्ती ढोल-ताशाच्या गजरात मंडपस्थळी आणल्या. त्यामुळे लालबाग, परळ, गिरगाव आदी भागांमध्ये उत्सवी वातावरण होते.
गेल्या दोन वर्षांत करोना संसर्गाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन गणेशोत्सवात आगमन-विसर्जन मिरवणुकींना परवानगी देण्यात आली नव्हती. अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र करोनाचे संकट नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुंबईमधील काही सार्वजनिक गणेश मंडळांनी १४ ऑगस्टपासून गणेशमूर्ती मंडपस्थळी नेण्यास सुरुवात केली. ढोल-ताशाचा गजर, गुलालाची उधळण आणि फडकणारे भगवे झेंडे यामुळे अवघे वातावरण भक्तीमय झाले होते.
बहुसंख्य गणेशमूर्ती
२८ ऑगस्ट रोजी मंडपस्थळी रवाना झाल्या आहेत. गणेशोत्सव ३१ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. कार्यशाळेतील उर्वरित गणेशमूर्ती या दिवशी मंडपस्थळी रवाना होतील. – रेश्मा खातू, मूर्तिकार
रविवारी सुटीचे निमित्त साधून मुंबईतील बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांनी ठिकठिकाणच्या गणेश कार्यशांळामधून मूर्ती मंडपस्थळी आणल्या.