मुंबई : क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी आणि नवीन क्षयरुग्णांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आगामी १०० दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेंतर्गत सुमारे ३ कोटी ४ लाख लोकांची मोफत क्षयरोग तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत देशातील निवडक ३४७ जिल्ह्यांमध्ये ७ डिसेंबरपासून या विशेष मोहिमेला सुरुवात झाली असून, त्यात महाराष्ट्रातील निवडक १७ जिल्हे, १२ महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेतील २४ एनटीपी क्षेत्रांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या मोहिमेत क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करून जास्तीत जास्त क्षयरोग रुग्ण वेळेत शोधून उपचाराखाली आणणे, क्षयरोगाचा मृत्यू दर कमी करणे आणि क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणे ही या मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत. दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जनसामान्यांमध्ये या गंभीर आजाराविषयी जागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत शंभर दिवसांची ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरी आणि ग्रामीण अशा सर्व स्तरावर क्षयरोग नियंत्रणासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री यांच्या धोरणानुसार सन २०२५ पर्यंत भारत देश हा क्षयरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

हेही वाचा >>> कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार तर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य स्तरावरून संबंधित जिल्हे व महानगरपालिका यांना कळविण्यात आलेले आहे. या मोहिमेत जनतेचा सहभाग वाढावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभागही घेतला जाणार आहे. या मोहिमेंतर्गत जास्त क्षयरुग्ण संख्या असलेल्या कार्यक्षेत्राचे मॅपिंग, त्या कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या लोकसंख्येचे मॅपिंग जिल्ह्यांकडून करण्यात आलेले असून त्यामध्ये ६० वर्षावरील व्यक्ती, मागील ५ वर्षातील टीबी बाधित रुग्ण, टीबी रुग्णाशी संपर्कातील व्यक्ती, धूम्रपान करणारे, मधुमेही बाधित, कुपोषित व्यक्ती, एचआयव्ही बाधित, इतर जोखीमग्रस्त गट व भागात तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत अतिजोखमीच्या लोकसंख्येचे मॅपिंग, यामध्ये झोपडपट्टी भाग, कारागृह, वृद्धाश्रम, आश्रमशाळा, जोखमेखालील औद्योगिक कार्यक्षेत्रे, आदींचा समावेश असून अंदाजे ३.४ कोटी लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> est Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तातडीची मदत, बेस्ट उपक्रमाकडून चौकशी समिती स्थापन

 अतिजोखमीच्या लोकसंख्येत एक्स-रे व नॅट तपासणीच्या मदतीने क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान क्षयरोगाचे निदान झालेल्या व्यक्तींना त्वरित व योग्य उपचाराखाली आणले जाणार आहे. क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींची पूर्ण तपासणी करून योग्य निदानानुसार उपचार प्रणाली राबविली जाईल. क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींना पोषणासाठी निक्षय पोषण योजनेचा लाभ तसेच निक्षय मित्र बनवून पोषणासाठी सहाय्य मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींचा पाठपुरावा करून संनियंत्रण करणे, क्षयरोग नसलेल्या परंतु क्षयरुग्णाच्या संपर्कात असलेल्या किंवा इतर जोखीमग्रस्त पात्र लोकांना क्षयरोग प्रतिबंधित उपचार प्रणाली प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ दरम्यान जिल्हा, तालुका, आरोग्य संस्था स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आराखडा तयार करण्यात आलेला असून त्याकरिता मार्गदर्शक सूचना जिल्ह्यांना व मनपा यांना कळविण्यात आलेल्या आहेत. या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, डॉ. स्वप्नील लाळे, संचालक मुंबई, डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक पुणे, सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे. या क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांना औषधोपचार पूर्ण करण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने मोफत औषधे दिली जातात. २०२५ पर्यंत भारत देश हा क्षयरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत ८० टक्के क्षयरोग प्रादुर्भाव प्रमाण कमी करणे, क्षयरोग मृत्यूचे प्रमाण ९० टक्के ने कमी करणे, क्षयरोग व उपचारासाठी क्षयरुग्णांचा होणारा खर्च शून्य करणे, ही या कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये आहेत. या कार्यक्रमांतर्गत ३ राज्य क्षयरोग प्रशिक्षण व नियंत्रण केंद्रे, ३ राज्य औषधी भांडार ५ क्षयरोग रुग्णालये, ३४ जिल्हा क्षयरोग केंद्रे अशा एकूण ८० आरोग्य संस्था कार्यरत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वी राज्यात सन २०१७ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३० लाख ३३ हजार ७७५ संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी नोंद झालेल्या २ लाख ०३ हजार ५०९ क्षयरुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

अहिल्यानगर, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम व यवतमाळ या १७ जिल्ह्यात तसेच अहिल्यानगर मनपा, अमरावती मनपा, धुळे मनपा, जळगाव मनपा, कोल्हापूर मनपा, मालेगाव मनपा, नागपुर मनपा, नांदेड-वाघाळा मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, सोलापूर मनपा, ठाणे मनपा व उल्हासनगरा महापालिकांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, बैल बाजार रोड, वांद्रे पूर्व , वांद्रे पश्चिम, बोरीवली, भायखळा, सेंटीनरी, चेंबुर, कुलाबा, दादर, दहिसर, घाटकोपर, गोरेगांव, गोवंडी, ग्रँट रोड, कांदिवली, कुर्ला, मालाड, मुलुंड, परेल, प्रभादेवी, सायन व विक्रोळी राबविण्यात येणार आहे. क्षयरोगावरील प्राथमिक उपचारांना दाद न देणाऱ्या (एमडीआर टीबी) रुग्णांच्या निदानासाठी राज्यात खासगी आणि सरकारी अशा १२ ठिकाणी रोगनिदानाची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अति जोखमिच्या लोकसंख्येत, क्षयरुग्णांमध्ये तसेच उपचारांना दाद न देणाऱ्या संशयित एमडीआर टीबी रुग्णांच्या विशेष प्रकारच्या औषधोपचाराचा विचार करता राज्यात २१ ठिकाणी नोडल डीआर टीबी केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात १४७ सीबी नॅट साइटस आणि २२९ नॅट साइटस सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप केल्या आहेत. निदान झालेल्या औषध प्रतिरोधक क्षयरुग्णांना वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध औषधे असलेली योग्य पथ्ये सांगितली जातात. डीआर टीबी रुग्णांवर उपचार सुरु करण्यासाठी २१ नोडल ड्रग रेझिस्टंट् टीबी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.