मुंबई : आपले अवघे आयुष्य स्वरचिंतनास वाहून घेतलेल्या पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक कारकीर्दीची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी चित्रमय पुस्तकांतून या कलावंताचा जीवनपट साकारला जाणार आहे. आठवडय़ाअखेरीस (८ आणि ९ एप्रिल रोजी) कुमार गंधर्व प्रतिष्ठानतर्फे आयोजित कालजयी या कार्यक्रमांत पंडितजींच्या जीवनचरित्राचेही प्रकाशन होणार आहे. याशिवाय पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा आरंभ ‘कालजयी’ संगीतोत्सवाद्वारे मुंबईत होईल.

कालजयीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सांगीतिक मेजवानीबरोबरच पंडितजींच्या जडणघडणीवर प्रकाश टाकणाऱ्या चरित्राचे प्रकाशनदेखील या सोहळय़ाचे खास आकर्षण आहे. हिंदूीत असलेल्या या चरित्राचे लेखन ध्रुव शुक्ल यांनी केले आहे. पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक योगदानाचा वेध घेणाऱ्या ‘कालजयी’ या दोन खंडाचे प्रकाशन काही वर्षांपूर्वी झाले होते. आता कुमारजींच्या आयुष्यातील घटना, घडामोडी, आव्हाने आणि स्वरांसह जगण्याचे त्यांचे तत्त्वज्ञान यांच्या तपशिलाने समृद्ध ग्रंथ संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा

चित्रमय मेजवानी..

कुमारजींची जडणघडण आणि शिकवण मांडणाऱ्या चित्रमय पुस्तकांची निर्मिती खास बाळ-कुमार वाचकांसाठी करण्यात येत आहे. मराठीतील या पुस्तकाचे लेखन ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे करीत असून ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे त्याची निर्मिती करण्यात येत आहे. इंग्रजी आणि हिंदूीतही ही पुस्तके अनुवादित करण्यात येणार आहेत. जूनपर्यंत हे चित्रग्रंथ प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी कोमकली यांनी दिली. सध्या झटपट यश मिळवण्याच्या मागे धावणाऱ्या पिढीला तपश्चर्या काय असते, साधना काय असते हे कळणे आवश्यक आहे. प्रत्येक पिढीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पण आता मुले पटकन निराश होतात. अशा वेळी कलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या कुमारजींचा आदर्श मुलांसमोर असावा यासाठी पुस्तकांची निर्मिती करण्यात येत आहे, असे पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी कोमकली यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

वर्षभर सूरबहार..

यानिमित्ताने ‘कुमार कालजयी’ या संगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उद्घाटनपर सोहळा ८ एप्रिल रोजी टाटा थिएटर, एनसीपीए येथे होणार असून भारतातील विविध शहरांमध्ये वर्षभर सुरू राहणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, नाटक आणि साहित्य अशा विविध कला क्षेत्रांतील नामवंत कलाकारांचे कला आविष्कार आणि सादरीकरणांचा समावेश असेल, अशी माहिती मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोमकली यांनी दिली. यावेळी पंडित कुमार गंधर्व यांचे नातू भूवनेश कोमकली व पंचम निषादचे शशी व्यासदेखील उपस्थित होते.

छायाचित्रांचे प्रदर्शन..

पंडित कुमार गंधर्व यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्रांचे विशेष प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम नि:शुल्क असून कार्यक्रमाच्या आधी प्रवेशिका उपलब्ध होणार आहेत.

मुंबईत काय?

मुंबईत संपन्न होणाऱ्या ‘कालजयी’ या जन्मशताब्दी सोहळय़ाचे आयोजन कुमार गंधर्व प्रतिष्ठानने एनसीपीए आणि पंचम निषाद यांच्या विशेष सहकार्याने केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संगीतोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रतिभावान कलाकारांचा आविष्कार सादर होणार आहे. टाटा थिएटर येथे दिनांक ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता भूवनेश कोमकली यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर प्रसिद्ध सतारवादक निलाद्री कुमार यांचे सतारवादन करतील. पहिल्या दिवसाची सांगता पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. तर ९ एप्रिल रोजी एनसीपीएमधील एक्सपिरीमेंटल थिएटर येथे एक विशेष संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात प्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे, ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर आणि कुमार गंधर्व यांचे शिष्य ज्येष्ठ गायक सत्यशील देशपांडे हे भारतीय शास्त्रीय संगीतातील पंडित कुमार गंधर्व यांच्या योगदानाचा मागोवा घेतील. त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता कलापिनी कोमकली यांचे गायन होणार आहे, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन आणि त्यानंतर पंडित वेंकटेश कुमार यांच्या गायकीने कार्यक्रमाची सांगता होईल.

Story img Loader