मुंबई : विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रदेशांनुसार भाषा बदलते, त्याप्रमाणे खाद्यासंस्कृतीतही वैविध्य आढळते. विविध राज्यांमध्ये सण, समारंभ व उत्सवांच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ केले जातात. या चविष्ट खाद्यापदार्थांच्या अनुषंगाने पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाफ साधणाऱ्या खाद्यासंस्कृतीबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. अशा वैविध्यपूर्ण पाककृतींसह खाद्यासंस्कृतीविषयी माहितीचा खजिना उलगडणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषांकाचे प्रकाशन मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता ठाणे (पश्चिम) येथील हॉटेल टिप टॉप प्लाझामध्ये होणार आहे. यानिमित्त खुल्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वादिष्ट आणि पौष्टिक आहाराचा मंत्र सांगणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकात समृद्ध पाककृतींची ओळख करून देण्यात येते. दरवर्षी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत उत्स्फूर्तपणे स्पर्धक सहभागी होतात आणि आपले पाककौशल्य दाखवतात. या वेळी तज्ज्ञ परीक्षक पाककृतींचे परीक्षण करतील. सणवार असो वा आनंदाचे छोटे छोटे क्षण साजरे करण्यासाठी गोड पदार्थांबरोबरच चविष्ट, चमचमीत पदार्थांवरही ताव मारला जातो. यंदाच्या पाककला स्पर्धेत आनंद द्विगुणित करणाऱ्या पनीरच्या वैविध्यपूर्ण पाककृती सादर करायच्या आहेत. याशिवाय, उपवासाचे नावीन्यपूर्ण पदार्थही या पाककला स्पर्धेत सादर करता येणार आहेत. या स्पर्धेत सादर केलेल्या पाककृतींमधून विजेत्या ठरलेल्या पाककृतींना ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषांक प्रकाशन सोहळ्यात परीक्षक व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. याप्रसंगी परीक्षक व मान्यवरांकडून खाद्याविषयक मुक्त संवाद साधत स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धकांना आपले पाककौशल्य दाखविण्यासह विविध पाककृतींची ओळख आणि खाद्यासंस्कृतीशी संबंधित माहितीही प्राप्त होते.

पाककला स्पर्धेविषयी…

उपवासाचे नावीन्यपूर्ण पदार्थ आणि छोटे छोटे क्षण खुलवणारे पनीरचे चमचमीत पदार्थ यापैकी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन शाकाहारी पदार्थ स्पर्धकांना घरून करून आणायचे आहेत. त्यापैकी एका पदार्थाचा परीक्षणासाठी विचार केला जाईल, याची नोंद घ्यावी. स्पर्धेतील विजेत्यांना पहिल्या तीन क्रमांकाची पारितोषिके देण्यात येणार असून, त्याशिवाय काही निवडक पाककृतींना विशेष पारितोषिके दिली जातील. पाककला स्पर्धेतील सहभाग निश्चित करण्यासाठी ०२२६७४४०३९०, ०२२६७४४०३७६, ०२२६७४४०२१५ या क्रमांकांवर सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

कधी : १८ फेब्रुवारी २०२५

वेळ : सायं. ५.३०

कुठे : हॉटेल टिप टॉप प्लाझा, पहिला मजला, तीन हात नाका, एलबीएस मार्ग, ठाणे पश्चिम

● मुख्य प्रायोजक : ● सुहाना स्पाइसेस

● सहप्रायोजक : ● केसरी टूर्स, ● इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ● केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, ● दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

● पॉवर्ड बाय : ● लागू बंधू ज्वेलर्स, ● व्ही.पी. बेडेकर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ● कात्रज डेअरी, पुणे</strong>