नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पुस्तक जत्रेच्या भारतीय भाषा विभागातील मराठी प्रकाशकांचा सहभाग, तेथील पुस्तक विक्री आणि मिळालेला प्रतिसाद याविषयी प्रकाशकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘मराठी प्रकाशक परिषद’ या संघटनेकडे माहितीचा अभाव असल्याचे समोर आले आहे.
या जत्रेच्या भारतीय भाषा विभागात अन्य राज्यांतील त्या त्या भाषेत पुस्तके प्रकाशित करणारे किती प्रकाशक सहभागी झाले होते, महाराष्ट्रातील प्रकाशकांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण किती होते, सर्वात जास्त प्रकाशक/ग्रंथविक्रेते कोणत्या राज्यातून सहभागी झाले होते, भारतीय भाषा विभागात सहभागी झालेल्या मराठी प्रकाशकांचा अनुभव काय, कोणत्या पुस्तकांची अधिक विक्री झाली, नवी दिल्लीतील मराठी भाषकांचा प्रतिसाद कसा मिळाला, याची माहिती एकूण वाचन संस्कृती आणि ग्रंथ व्यवहारासाठी मोलाची ठरली असती.
ही माहिती घेण्यासाठी पुस्तक जत्रेत सहभागी झालेले आणि मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मराठी प्रकाशक परिषदेचे पदाधिकारी अरूण जाखडे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा, मला या विषयावर काहीही बोलायचे नाही, असे उत्तर जाखडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिले. ‘आम्ही दरवर्षी या पुस्तक जत्रेत सहभागी होतो. किती पुस्तक विक्री झाली त्यापेक्षा मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधीत्व आम्ही येथे करतो, हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा