Nagpur News Today 26 April 2025 महाराष्ट्राची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि महत्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यांतील ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणूण घ्या. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली व पुण्यातील पर्यटकांचा मृत्यू झाला. तसेच काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या घटनेसंबंधी तसेच इतर घडामोडींबाबत ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News, 26 April 2025

21:02 (IST) 26 Apr 2025

रिक्षातच राहिली १२ तोळे सोने असलेली बॅग… दहिसर पोलिसांनी अवघ्या दोन तासात मिळवली बॅग…

रिक्षाने प्रवास करताना दहिसर येथील नितीन शिळीमकर (५३) त्यांच्याकडील १२ तोळे साेने असलेली बॅग रिक्षामध्येच विसरले. त्यासांदर्भात त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. …सविस्तर वाचा
20:48 (IST) 26 Apr 2025

‘युवा सेना’ आणि ‘बुक्टु’च्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल, मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाबाहेरील आंदोलनप्रकरणी आझाद मैदान पोलिसांची कारवाई

मुंबई विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही संघटनेस किंवा व्यक्तीस कोणत्याही स्वरुपाच्या सभा, आंदोलने, मोर्चा, उपोषण, निषेध मोर्चा, बैठका व तत्सम कोणत्याही कार्यक्रमाचे पूर्वपरवानगीशिवाय आयोजन करता येणार नाही, असा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सप्टेंबर २०२४ च्या बैठकीत घेण्यात आला होता. …अधिक वाचा
20:47 (IST) 26 Apr 2025

बिबट्याच्या हल्ल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या २० वर्षाच्या महाविद्यालयीन युवतीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.

नाशिक-कळवण रस्त्याजवळील वाघाड कालव्यालगत राजेंद्र चव्हाण यांची वस्ती आहे. चव्हाण यांची मुलगी पायल ही शुक्रवारी सायंकाळी गुरांना घास कापण्यासाठी शेतात गेली होती. पायल बेसावध असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. पायलने आरडाओरड केल्यामुळे नातेवाईकांनी घराबाहेर धाव घेतली. बिबट्याला पिटाळून लावले.

जखमी पायलला तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पायल ही दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती.

20:32 (IST) 26 Apr 2025

शिक्षक भरतीत पुन्हा यवतमाळवर अन्याय, ‘पवित्र पोर्टल’ टप्पा दोन प्रक्रियेतून वगळले

यामुळे स्थानिक शिक्षण संस्था आणि भावी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. …सविस्तर वाचा
20:21 (IST) 26 Apr 2025

उडानअंतर्गंत ‘या’ ७४ खे‌ळाडूंना आर्थिक मदत

महापालिकेद्वारे ७४ खेळाडूंना ५७ लक्ष ८९ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आले. …सविस्तर बातमी
19:57 (IST) 26 Apr 2025

काश्मीरमधून परतलेल्या पर्यटकांना कर्मभूमीत पाय ठेवताच अश्रू अनावर; खराब महामार्ग अन् वाचले प्राण

जन्म व कर्मभूमीत पाय ठेवताच पर्यटकांचे अश्रू अनावर झाले. …सविस्तर बातमी
19:42 (IST) 26 Apr 2025

रात्रभरात उभारला छत्रपती संभाजी महाराजांचा सातफुटी पुतळा! अज्ञाताविरुद्ध गुन्हा, मलकापूर पांग्रात तणाव

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनाक्रमामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. …अधिक वाचा
19:00 (IST) 26 Apr 2025

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांवर आणखी एक संकट, भूस्खलनामुळे…

सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेले राज्यातील सुमारे १०० नागरिक भूस्खलनामुळे अडकल्याची माहिती मिळाली. …सविस्तर बातमी
18:41 (IST) 26 Apr 2025

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न.. (छाया- दीपक जोशी)

18:40 (IST) 26 Apr 2025

मुंबई : खारमधील स्मशानभूमी दोन आठवडे बंद, सांताक्रुझ स्मशानभूमीत पर्यायी व्यवस्था

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने खार पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे १ ते १५ मे या कालावधीत स्मशानभूमीतील दहन यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांच्या सेवेसाठी सांताक्रुझमध्ये पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

खारदांडा येथे वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या कामांसाठी स्मशानभूमी बंद ठेवण्याबाबत झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे महानगरपालिकेला पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार संबंधित स्मशानभूमी १ ते १५ मे या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. एच पश्चिम विभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘एच पश्चिम’ विभागातील सांताक्रुझ स्मशानभूमी येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर खारदांडा स्मशानभूमी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

18:21 (IST) 26 Apr 2025

मनमाडकरांना लवकरच नव्या योजनेतून पाणी, चाचणी यशस्वी

दीड वर्षापासून या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. …सविस्तर बातमी
18:03 (IST) 26 Apr 2025

महिलेचा खून करून मृतदेह फ्रिजच्या थर्माकॉलमध्ये…, आता न्यायालयाने आरोपीला थेट….

या हत्याकांडाचा कपीलनगर पोलिसांनी छडा लावून दाम्पत्याला अटक केली होती. …अधिक वाचा
17:47 (IST) 26 Apr 2025

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर…? चंद्रशेखर बावनकुळे थेटच बोलले…

नागपुरात माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितलं… …सविस्तर बातमी
17:36 (IST) 26 Apr 2025

भर उन्हाळयात गारपीट! वाचा, तुमच्या गावात कसे असेल वातावरण….?

विदर्भातील तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले होते. …सविस्तर बातमी
17:19 (IST) 26 Apr 2025

सोनिया गांधींनी राहुल यांच्या जिभेलाच चटके…, भाजप खासदाराच्या वक्तव्याने…

भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. …सविस्तर वाचा
16:25 (IST) 26 Apr 2025

ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात शरद पवार गटही आक्रमक, आमदार जितेंद्र आव्हाडांनी क्लस्टरचे घरावरील क्रमांक पांढऱ्या रंगाने पुसले

आव्हाडानंतर रहिवाशांनी घरावरील क्रमांक पुसून टाकले …वाचा सविस्तर
15:52 (IST) 26 Apr 2025

पुणे: पद्मावती भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

मयूर रंगनाथ आरडे (वय २४, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. …वाचा सविस्तर
15:38 (IST) 26 Apr 2025

डोंबिवलीतील भ्याड हल्ल्यातील मृत पर्यटकाची शवपेटी शिवमंदिर स्मशानभूमीत अडगळीत, स्मशानभूमीत बाल मजुरांचा वापर

दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांना दहशतवाद्यांनी निर्घृणपणे मारले. …वाचा सविस्तर
14:58 (IST) 26 Apr 2025

राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी, शासनाकडून…

त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. …वाचा सविस्तर
14:41 (IST) 26 Apr 2025

गिरणी कामगार ठाम… आशिष शेलार यांच्या कार्यालयावर मोर्चा…

गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेसाठी पावणेदोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे अर्ज सादर केले आहेत. …अधिक वाचा
13:36 (IST) 26 Apr 2025

‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यावर फिरता जुगार; चाहत्यांसाठी बुलेटने घरपोच सेवा…

आरोपींकडून पोलिसांनी १५ हजार रूपये, दोन मोबाईल, मोबाईल मधील काही स्क्रीन शॉट, चिठ्या आणि बुलेट असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. …सविस्तर वाचा
13:32 (IST) 26 Apr 2025

उरण : प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून आंदोलन, भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधकामावरील कारवाई थांबविण्याची मागणी

चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही उरणमधील द्रोणागिरी नोडचे ४०० पेक्षा अधिक सिडको प्रकल्पग्रस्त साडेबारा टक्के भूखंडांपासून वंचित आहेत. …वाचा सविस्तर
13:26 (IST) 26 Apr 2025

डोहावाले बाबांची अशी आहे आख्यायिका…, थेट पुराणातील संदर्भ म्हणून उडते गर्दी

या डोहावाले बाबा मंदीर पारिसरात होणाऱ्या होम हवन, पूजेत भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. …सविस्तर बातमी
13:15 (IST) 26 Apr 2025

परभणीत उपमुख्यमंत्री पवारांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, वाहनावर फेकल्या चुन्याच्या डब्या

परभणी जिल्ह्यातच माळसोन्ना या गावी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली. …सविस्तर वाचा
13:13 (IST) 26 Apr 2025

ताडोबात बुद्ध पौर्णिमेला निसर्गनुभव उपक्रम, जाणून घ्या शुल्क…

निसर्ग प्रेमींकरिता ताडोबातील वन्यजीवन मचाणीवर बसून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे. …सविस्तर बातमी
13:03 (IST) 26 Apr 2025

खोळंबलेली कामे पूर्ण करण्यासाठी आता ‘सेवा पंधरवडा…’!

राज्यामध्ये सन २०२२ व २०२३ या वर्षी सेवा पंधरवडा, महिना राबविण्यात आला होता. …अधिक वाचा
12:56 (IST) 26 Apr 2025

कल्याणमध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या फरार इसमाला आंबिवलीतून अटक

विनोद फननन मौर्या असे या इसमाचे नाव आहे. कल्याणमधील एका हाॅटेलमध्ये दोन महिलांच्या साथीने वेश्या व्यवसाय चालविणारा विनोद मौर्या मागील महिनाभरापासून फरार होता. …सविस्तर वाचा
12:28 (IST) 26 Apr 2025

गायवाटप घोटाळ्यातील दोषी आयएएस अधिकारी शुभम गुप्ताला वाचविण्याचा प्रयत्न ?

पीडित आदिवासींनी याविरोधात रोष व्यक्त केला आहे. …अधिक वाचा
12:25 (IST) 26 Apr 2025

“दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी मोदींना शक्ती द्यावी”, जे. पी. नड्डा यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना

जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. …वाचा सविस्तर
12:16 (IST) 26 Apr 2025

पाचवी, आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर… किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण?

अंतरिम निकालात काही आक्षेप, दुरुस्ती असल्यास गुणपडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ४ मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. …अधिक वाचा

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे