Nagpur Pune Mumbai Latest Marathi News : नातेवाईकाकडील लग्नसमारंभ आटोपून रात्री २ वाजताच्या सुमारास आपल्या मामेभावासह जंगलमार्गे घरी परत जात असलेल्या चार मुलींवर सात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितांपैकी तीन मुली अल्पवयीन आहेत.

याशिवाय मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे. बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सूरज गोसावीला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  मुंबई,पुणेसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Temperature Update Today, 28 April 2025

21:29 (IST) 28 Apr 2025

अबब… ‘या’ महिलेने असे काय केले! तब्बल ३९ गुन्हे; अखेर…

तिच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ...वाचा सविस्तर
21:23 (IST) 28 Apr 2025

पावसाळ्यातही मुंबईतील रस्ते खड्डेमय? रस्त्यांची कामांची मुदत गाठण्याचे पालिकेसमोर आव्हान

मुंबईत एकूण दोन हजार किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी तब्बल ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...सविस्तर बातमी
21:16 (IST) 28 Apr 2025

पुणे विमानतळाच्या ‘कनेटिव्हिटी’ला गती, खडकवासला-खराडी मेट्रो मार्गिकेसह चार मार्गिका विमानतळाला जोडण्याचे विचाराधीन

दरम्यान, वाढत्या विमान प्रवाशांमुळे आगामी पन्नास ते शंभर वर्षांचा विचार करून पुणे विमानतळाचा विस्तारही करण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
21:16 (IST) 28 Apr 2025

पुणे विमानतळाच्या ‘कनेटिव्हिटी’ला गती, खडकवासला-खराडी मेट्रो मार्गिकेसह चार मार्गिका विमानतळाला जोडण्याचे विचाराधीन

दरम्यान, वाढत्या विमान प्रवाशांमुळे आगामी पन्नास ते शंभर वर्षांचा विचार करून पुणे विमानतळाचा विस्तारही करण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
21:09 (IST) 28 Apr 2025

नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची धुळ्यात घोषणा

धुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान व सेवा हक्क दिनानिमित्ताने सेवा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम महसूलमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. ...अधिक वाचा
20:51 (IST) 28 Apr 2025

एमएचटी-सीईटीतील गणिताच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक चुका, आक्षेप नोंदवण्यासाठीची सुविधा दिली जाणार असल्याचे सीईटी सेलचे स्पष्टीकरण

या संदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण सीईटी सेलकडून देण्यात आले. ...सविस्तर बातमी
20:39 (IST) 28 Apr 2025

पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयात वडापाव; उडाण यात्री कॅफेच्या सेवेला प्रारंभ

केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांना विमानतळावर स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी ही योजना सुरू केली आहे. ...सविस्तर वाचा
20:25 (IST) 28 Apr 2025

बुधल्या डोंगरावरील वणव्याची वन्यजीवांना झळ, बिबट्या येऊ नये म्हणून आग लावल्याचा संशय

आगीत पाच हेक्टरवरील गवत तसेच काटेरी, झुडपी वनस्पती भस्मसात झाली. पक्ष्यांची झाडांवरील घरटी, त्यातील पाखरांनाही झळ बसली. ...सविस्तर बातमी
20:22 (IST) 28 Apr 2025

काँग्रेस आमदाराकडून फडणवीस यांचे कौतुक, म्हणाले “नागरिकांच्या तत्पर्तेसाठी पुढाकार गौरवास्पद”

नागरिकांच्या तत्पर्तेसाठी फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे,असे ते म्हणाले. ...अधिक वाचा
20:11 (IST) 28 Apr 2025

नाशिक : सिडकोत पुन्हा एक हत्या

पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
20:07 (IST) 28 Apr 2025

‘‘विजय वडेट्टीवारांनी देशभक्तांच्या जखमांवर मीठ चोळले,’’ भाजप प्रदेश सरचिटणीसांची टीका; म्हणाले…

देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे थांबवा, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली. ...अधिक वाचा
20:02 (IST) 28 Apr 2025

दिवाळीपूर्वी मुंबईतील ५ हजार घरांची सोडत, मात्र घरांची माहिती गुलदस्त्यातच

सोडतीची, सोडतीतील घरांची संख्या जाहीर करण्यात आली असली तरी घरे कोणत्या परिसरात, कोणत्या उत्पन्न गटासाठी असणार याचे तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. ...अधिक वाचा
19:43 (IST) 28 Apr 2025

कामातील हलगर्जीपणा कंत्राटदाराला भोवला, जलवाहिनी फुटल्याप्रकरणी कंत्राटदाराला ८३ लाखांचा दंड

जलवाहिनी फुटल्यामुळे गोवंडी- मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, शीव, चुनाभट्टी, टिळक नगर, लालबाग, शिवडी, वडाळा, माटुंगा, दादर मधील अनेक भागांतील पाणीपुरवठा महापालिकेमार्फत बंद करण्यात आला होता. ...वाचा सविस्तर
19:33 (IST) 28 Apr 2025

शिक्षक, मुख्याध्यापक वेगवान… किती शाळांचे ‘जिओ टॅगिंग’ पूर्ण?

शिक्षकांच्या प्रतिसादामुळे आतापर्यंत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले असून, उर्वरित शाळांचे मॅपिंगही पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...सविस्तर वाचा
19:27 (IST) 28 Apr 2025

बँक मित्र आंदोलनाच्या पवित्र्यात! महाराष्ट्रदिनी राज्यात जिल्हा मुख्यालयांसमोर धरणे

महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन १ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होईल. ...अधिक वाचा
19:16 (IST) 28 Apr 2025

लग्नाचा खर्च टाळून बांधले शिवार रस्ते, एका सत्यशोधक विवाहाने समाजासमोर…

नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर दिला. ...वाचा सविस्तर
18:13 (IST) 28 Apr 2025

सुरक्षा साहित्य न वापरल्याने ग्रंथचा मृत्यू? कंत्राटदाराच्या लेखी दाव्यामुळे खळबळ

या कंत्राटदाराला पालिकेचे अभय मिळणार का, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांच्या वर्तुळात उपस्थित झाला आहे. ...वाचा सविस्तर
17:36 (IST) 28 Apr 2025

हुश्श! आता नापासचा ठप्पा लागणार नाही, मिळणार थेट पदवी प्रवेश

बारावीत नापास झाले की, पुढचा पदवी प्रवेश टप्पा थांबतो, हे सुध्दा खरेच. मात्र यापुढे तसे होणार नाही. ...वाचा सविस्तर
17:16 (IST) 28 Apr 2025

वादग्रस्त वक्तव्यानंतर वडेट्टीवारांचा सरकारला पाठिंबा, म्हणाले…

दहशतवादी आणि त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार जी कारवाई करेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. ...सविस्तर बातमी
16:35 (IST) 28 Apr 2025

काटोलमध्ये खरेदी विक्री संस्थेत भाजप पराभूत, महाविकास आघाडीची सत्ता

काटोल शेतकरी खरेदी-विक्री संस्थेत विविध गटातील एकूण ११ पैकी ९ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. ...सविस्तर वाचा
16:35 (IST) 28 Apr 2025

हाती तलवार घेत नवनीत राणा म्‍हणाल्‍या, “हिंदुस्थानावर डोळे काढाल, तर डोळेच काढून…”

नवनीत राणा यांनी तलवार म्यानातून बाहेर काढून पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी त्यांनी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. ...अधिक वाचा
16:13 (IST) 28 Apr 2025

शेकडो शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार, जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलिसांची नोटीस

२०१४च्या शिक्षक भरतीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांची गैरमार्गाने भरती करण्यात आली. ...सविस्तर वाचा
15:01 (IST) 28 Apr 2025

नांदेडात नायब तहसिलदारावर वाळू माफियांचा हल्ला, एका आरोपीस अटक हायवा ट्रक माफियांनी पळवला

जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पोलीस प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली, तरी शनिवारी रात्री नायब तहसिलदाराच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला चढवला. रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
14:52 (IST) 28 Apr 2025

बॉलिवूड, टॉलीवूड प्रमाणे आता मराठी चित्रपट ‘इंडस्ट्री’, महाराष्ट्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

दाक्षिणात्य चित्रपट तसेच बॉलीवूड प्रमाणे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीचा विकास व्हावा यासाठी राज्य शासन याला उद्योगाचा दर्जा देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रदिनी याबाबत अधिकृत घोषणा करतील. ...सविस्तर बातमी
13:39 (IST) 28 Apr 2025

चार मुलींवर सात नराधमांचा सामूहिक बलात्कार, तीन अल्पवयीन मुलींचा समावेश

नातेवाईकाकडील लग्नसमारंभ आटोपून रात्री २ वाजताच्या सुमारास आपल्या मामेभावासह जंगलमार्गे घरी परत जात असलेल्या चार मुलींवर सात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला ...सविस्तर वाचा
13:30 (IST) 28 Apr 2025

दागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले; सोन्याची तार चोरून चोरटे पसार

सराफ व्यावसायिकांना दागिने घडवून देणाऱ्या कारागिराला चोरट्यांनी लुटल्याची घटना रविवार पेठेत घडली. ...सविस्तर वाचा
13:26 (IST) 28 Apr 2025

मुंबईतील १७ पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला

मुंबईत राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिल्यानंतर त्यांनी देश सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...वाचा सविस्तर
13:16 (IST) 28 Apr 2025

डोंबिवली रेल्वे स्थानकातील रखडलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला मिळणार गती

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण बाजुकडील सरकत्या जिन्याचे काम मागील सहा महिन्यापासून रखडले आहे. ...सविस्तर बातमी
13:01 (IST) 28 Apr 2025

कल्याणमध्ये तोतया पोलीस अधिकाऱ्याकडून लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

आपण पोलीस अधिकारी आहोत, असे एका तरूणीला सांगून तिला लग्नाचे आमिष दाखवून तरूणीकडून ७० हजार रूपयांचा ऐवज उकळणाऱ्या ठाण्यातील एका तोतया पोलीस अधिकाऱ्याविरुध्द तरुणीने तक्रार दाखल केली आहे. ...वाचा सविस्तर
12:54 (IST) 28 Apr 2025

Mumbai BEST Fare Hike : "बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध", ठाकरेंच्या शिवसेनेची थेट भूमिका; आदित्य ठाकरे म्हणाले, "मुंबईकरांंना..."

BEST Bus Fare in Mumbai : बेस्ट उपक्रमाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यात बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला होता. त्याला आता मान्यता मिळाल्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसै मोजावे लागणार आहेत. ...सविस्तर वाचा

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे