Nagpur Pune Mumbai Latest Marathi News : नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार डॉ. संजय मेश्राम त्याला अपवाद ठरले. त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोकळ्या मनाने स्तुती केली.
वसई येथील सिमेंटचे ब्लॉक बनविण्याच्या कंपनीतून सुरू असलेला मेफेड्रॉन (एमडी) बनविण्याचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार किलो ५३ ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुंबई,पुणेसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 29 April 2025
परवानगी घेऊनही भोगवटा पत्र न मिळालेल्या बांधकामांना भोगवटा पत्र
पिंपरी : आकर्षक परताव्याच्या बहाण्याने २८ लाखांची फसवणूक
पिंपरी : कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दहा टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची २८ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पीडित व्यक्तीने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना संपर्क साधला. एका कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला दहा टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. आरोपींवर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी ४३ लाख रुपये गुंतवणूक केली. दरम्यान, आरोपींनी काही महिने फिर्यादी यांना १५ लाख रुपये परतावा दिला. त्यानंतर रक्कम देणे बंद करून त्यांचे उर्वरित २८ लाख रुपये न देता फसवणूक केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील मृतांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. मृतांच्या कुटुंबात अन्य कोणाकडेही उत्पन्नाचे साधन नसल्यास एका वारसाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत अतिरेकी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या हल्ल्यामध्ये राज्यातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सरकारने अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मृतांच्या कुटुंबियातील मुलांच्या शिक्षण व रोजगाराकडे विशेष लक्ष देण्यात येईल. त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात येईल आणि गरजेनुसार शासकीय नोकरीही देण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केला होता.
तिढा प्रभादेवी पुलाचा… कुर्ल्याला जाणार नाही…दोन इमारतींमधील प्रकल्पबाधीत आक्रमक, लेखी आश्वासनाशिवाय पूल बंद होऊ देणार नाही
ग्रामीण भागात अक्षय तृतीया सणाची पारंपारिक ओळख
‘बनावट इंग्रजी दारू’च्या कारखान्यावर पोलिसांचा छापा
‘पीएमआरडीए’च्या सहाही टीपी स्कीमचे पुनर्विलोकन; रस्त्यांची रुंदी अठरा मीटरपेक्षा जास्त ठेवण्याच्या मुख्यंत्र्यांच्या आदेशाने निर्णय
गंभीर जखमी पोलीस कर्मचाऱ्याला हेलिकॉप्टरने थेट नागपूरला हलविले, पण…
शाळांना उन्हाळी सुटी किती, शाळा कधी सुरू होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती...
लेडीज बारवरील कारवाईत कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी अडकले
‘नीट यूजी’मध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी ‘एनटीए’ सतर्क; संशयास्पद दाव्यांची तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था विकसित
मुलगी ‘युपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण झाली! आनंदाच्या भरात वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका…
माजी मंत्री बच्चू कडूंच्या लेटलतिफीचा नृत्य स्पर्धेच्या मुलांना मनस्ताप
माणिकपूर येथे रोहित्राला भीषण आग, वीज पुरवठा खंडित; १७ तासापासून नागरिक विजेविना
रेल्वेचा वेग वाढणार! ‘रनिंग लूप लाईन्स’च्या मदतीने आता….
पोट भरणारी सुपीक शेती प्रकल्पांना कशी द्यायची? भूसंपादनावरून शेतकऱ्यांमधील खदखद आता संघर्षाच्या…
नीट (यूजी) २०२५ परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एनटीए सज्ज, विद्यार्थ्यांना तक्रारीसाठी स्वतंत्र व्यासपीठ
अक्षय तृतीयेनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल; मध्यभागात मोटारी, पीएमपी बसला प्रवेश बंद
महापालिकेने बेस्टला एक हजार कोटी द्यावे - वर्षा गायकवाड, खासगीकरण बंद केल्यास बेस्टची समस्या सुटेल
व्यापारी म्हणतात, "पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद करणार"
भारतात व्हेरिकोज व्हेन्सचे रुग्ण वाढत आहेत! महापालिका रुग्णालयात अत्यल्प दरात सर्वोत्तम उपचार…
सेवा हक्क दिनी आठ ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्राचा शुभारंभ
सराईत मोबाइल चोर अटकेत
सरकारी कार्यालयांमध्ये साजरा होणार श्री चक्रधर स्वामींचा ‘अवतार दिन’
कामाठीपुराचा पुनर्विकास लालफीतीत, विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा म्हाडाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
गंगापूरमधील विसर्गाने गोदापात्रात पानवेलींचा कचरा
...आणि आतली बातमी फुटली
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे