मुंबई : पुणे येथील पोर्शे कार अपघाताशी संबंधित प्रकरणातील अल्पवयीन चालकाच्या मित्राच्या वडिलांना अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. मे महिन्यात झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुराव्याचा विचार करता याचिकाकर्त्याने अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. शिवाय, त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो, असे न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्याची अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका फेटाळताना नमूद केले.
अपघात झाला तेव्हा याचिकाकर्त्याचा अल्पवयीन मुलगा कारच्या मागील आसनावर बसला होता. तसेच, अल्पवयीन चालकासह तोही मद्याच्या नशेत होता, असा पोलिसांचा आरोप आहे, पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरून चाललेल्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील दोघा कर्मचाऱ्यांना मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन चालकाने धडक दिली होती. या घटनेनंतर अल्पवयीन चालकाच्या पालकांनी त्याच्याऐवजी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी डॉक्टरांना लाच दिली होती. त्याचप्रमाणे, याचिकाकर्त्यानेही ससून रुग्णालयातील डॉक्टरांशी संगनमत करून आपल्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी याचिकाकर्ता फरार असल्याचे पोलिसांतर्फे न्यायालयाला सांगितले. तसेच, त्याला अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला. तर, याचिकाकर्त्यावर पुरावे नष्ट करणे किंवा गुन्हेगाराला पाठिशी घालण्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप दाखल केला जाऊ शकतो. हे आरोप जामीनपात्र असल्याचेही याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र पोलिसांच्या म्हणण्याशी सहमती दर्शवून त्याची याचिका फेटाळली.