पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली ‘शिवनेरी’ किंवा निमआराम गाडी द्रुतगती महामार्गावर आली की, पुण्यातील वाहतूक कोंडी सुटल्याचे पाहून प्रवासी निश्चित होतात. मळवली गावाजवळच्या फुडमॉलवर गाडी शंभर टक्के थांबणार, अशी गाठ मनाशी बांधलेल्या या प्रवाशांचा भ्रमनिरास होतो़ गाडी रस्त्यालगतचा तो फुडमॉल ओलांडते आणि पुढे लोणावळ्याजवळ येत़े अचानक द्रुतगती महामार्ग सोडून खाली उतरून सेंटर पॉइंट नामक एका गचाळ हॉटेलाजवळ थांबते.
हतबल प्रवासी नाके मुरडत आणि तीच मुठीत धरत गलिच्छ प्रसाधनगृहात जातात. मात्र सेंटर पॉइंटचा मालक गाडीच्या चालकाच्या हाती काही पैसे टेकवतो. एक मोठा वळसा घेऊन गाडी पुन्हा द्रुतगती महामार्गाला लागते आणि प्रवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात. विशेष म्हणजे एसटी प्रशासनाला या नव्या थांब्याबद्दल काहीच माहिती नसते.
एसटीच्या नियमांप्रमाणे आखून दिलेला मार्ग सोडून एसटी चालक गाडी बाहेर नेऊ शकत नाही. मात्र हा फुडमॉल द्रुतगती महामार्गाच्या खाली आहे. येथे ये-जा करण्यासाठी किमान दीड ते दोन किलोमीटरचा वळसा घ्यावा लागतो.
याबाबत एसटीच्या वाहतूक शाखेशी संपर्क साधला असता, या फुडमॉलशी एसटीचा कोणताही करार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपली एसटी येथे नेण्यासाठी एसटी चालक फुडमॉलच्या मालकाकडून पन्नास ते शंभर रुपये घेतात, असे एसटीतीलच काही कर्मचारी खासगीत कबूल करतात.
एसटी गाडय़ांचा ‘सेंटर पॉइंट’ थांबा प्रवाशांसाठी तापदायक
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली ‘शिवनेरी’ किंवा निमआराम गाडी द्रुतगती महामार्गावर आली की, पुण्यातील वाहतूक कोंडी सुटल्याचे पाहून प्रवासी निश्चित होतात.
First published on: 20-08-2013 at 03:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune st stop at slut central point restaurant