नवी मुंबई येथील बिल्डर सुनील लोहारिया यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश बिजलानी आजारपणाचा बनाव करून रुग्णालयात पंचतारांकित सुविधा उपभोगत असल्याचे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस व ठाणे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी दिला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयातून नव्याने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी बिजलानीने स्वत:च परत पाठविण्याची विनंती रुग्णालयाकडे केली. त्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१चे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनी न्यायालयाला दिली.
लोहारिया हत्येतील बिजलानीचा तारांकित निवास : पोलीस-डॉक्टरांवर कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश
नवी मुंबई येथील बिल्डर सुनील लोहारिया यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश बिजलानी आजारपणाचा बनाव करून रुग्णालयात पंचतारांकित सुविधा उपभोगत असल्याचे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस व ठाणे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला …
First published on: 28-09-2013 at 12:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punish cops docs who allowed bijlani to linger in hospital hc to state