फोर्ट भागात खादी भांडार इमारतीच्या अगदी पाठीशीच असलेल्या रस्त्यावर ‘क्वीन्स मॅन्शन’ आहे. अर्थातच जुनी इमारत. तिच्या तिसऱ्या मजल्यावर- ‘लिफ्ट’ सुरू असल्यास त्या उद्वाहनातून किंवा मग लाकडी जुने प्रशस्त जिने चढून- जायचं. ‘गॅलरी केमोल्ड प्रिस्कॉट रोड’चं प्रचंड दार ढकललंत की तब्बल ८० छोटीमोठी रंगचित्रं किंवा रंगीत रेखाचित्रं आणि मोठय़ा खोलीभर पसरलेलं एक मांडणशिल्प, असा ऐवज पाहायला मिळेल.. ध्रुवी आचार्य यांच्या या कलाकृती आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘रंगीत रेखाचित्रं’ आणि रंगचित्रं, या दोन्हीकडे ध्रुवी यांनी वापरलेल्या प्रतिमा या हल्ली ग्राफिक नॉव्हेलमधली पात्रं असतात, तशा आहेत. यापैकी अनेक चित्रांमध्ये एक स्त्री दिसते. ही नायिका, ही कदाचित स्वत: चित्रकर्तीचीच प्रतिमा असेल, पण ते ध्रुवी यांनी स्पष्ट केलेलं नाही. प्रत्येक चित्रातली ही स्त्री-प्रतिमा एकमेकांसारखीच आहे, असंही नाही. अनेक प्रतिमांमध्ये मानवी आकाराचं विघटन होतं आणि त्यातून गुलमोहोराच्या पाकळीसारखे किंवा अन्य कसले आकार निघतात, काही चित्रांमध्ये गुलमोहराची पाकळी हा आकारच कॉमिक बुकच्या ‘स्पीच बबल’सारखा होतो.. ध्रुवी यांनी रंगचित्रांमध्ये रंग खूप वापरलेले असतात आणि काही वेळा कॅनव्हासऐवजी लिननवर इपॉक्सीसारख्या द्रव्यानं आधी एक थर चढवून घेऊन मग रंगचित्रं केलेली असतात. चित्रांमध्ये डिझाइनचा भागही भरपूर दिसतो. अशा वैशिष्टय़ांमुळेच, ही चित्रं गंभीर नाहीत, असं प्रेक्षकांना वाटू शकेल.. पण हा समज गैरच ठरेल. ध्रुवी यांनी या प्रदर्शनात अत्यंत गंभीर विषय हाताळला आहे.

जन्माचा जोडीदार, अनेक वर्षांची साथ देणारा अपघातानंतर जबर जखमी झाल्यामुळे गेला. हा अपघातही महाराष्ट्रातल्या हिल स्टेशनवर, गंमत म्हणून केलेल्या घोडेस्वारीदरम्यान घडलेला; त्यामुळे वैद्यकीय सुविधांची वानवा. हा धक्का आणि हे दु:ख विचित्र होतं.. पण त्यानंतरही जवळपास आठ र्वष गेली. तेवढय़ा काळात लोक आपल्याशी कसे वागू लागले आहेत, ‘विधवा’ या शब्दाविषयी समाजाची संकल्पना कशी जुनाटच आहे.. हे चित्रकर्तीच्या लक्षात आलं आणि त्या ‘विचित्र’ अनुभवांना चित्ररूप मिळालं.

यातून जे काही झालं आहे, ते पाहणारी माणसं चित्रांमध्ये काय काय पाहू शकतात, याची कसोटी ठरणारं आहे. ही चित्रं रूढार्थानं तंत्रशुद्ध नाहीतच, पण किती तरी गोष्टी सांगण्याची क्षमता त्यांच्यात आहे. तरीदेखील चित्रकर्तीनं काही चित्रांमध्ये शब्द वापरले आहेत. विशेषत: तीन पुरुष – त्यांच्या एका हातात सांत्वनाचं फूल आणि दुसऱ्या हातात पिस्तुलं- असं जे चित्र आहे, त्यात तर अख्खा परिच्छेदच आहे. हे शब्द बेछूट गोळीबारासारखेच आहेत, असं लक्षात आल्यावर हातातल्या पिस्तुलांचा ‘अर्थ’ समजतो. नवरा गेला, त्या दिवशीचा प्रसंग मांडणशिल्पामध्ये चित्रकर्तीनं लिहून काढला आहे. हे अख्खं मांडणशिल्प फरशीऐवजी गादी असलेल्या खोली, गादीसारख्या फोम वा कापसापासूनच बनवलेल्या खोलीतल्या सर्व वस्तू असं हे मांडणशिल्प प्रेक्षकाला ‘आत ओढणारं’ आहे.. त्याबद्दल निराळा लेखच लिहावा लागेल, इतका या खोलीभर मांडणशिल्पाचा अनुभव संपृक्त (इन्टेन्स) आहे. या खोलीच्या भिंतींवर ध्रुवी यांच्या डायरीतली अनेकानेक रेखाचित्रं आहेत, ती बाहेरच्या एकंदर ८० चित्रांपेक्षा निराळी.

हे प्रदर्शन वेळ काढून पाहण्यासारखं आहे, पण बारा नोव्हेंबरच्या शनिवारी हे प्रदर्शन कदाचित संपणार आहे. त्याला मुदतवाढ मिळू शकेल, पण कदाचितच. तेव्हा, चुकवू नका.