नाल्यांत ओल्या गाळाखाली मातीची टणक ढेकळे; गतवर्षीच्या नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह
मुंबईची नालेसफाई वेळेत होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच गतवर्षी किंवा त्याही आधीच्या वर्षांतील नालेसफाईवर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार उजेडात येत आहे. अनेक ठिकाणी उपसलेल्या गाळाच्या खालच्या थरात मातीमिश्रित कचऱ्याची टणक ढेकळे आढळली आहेत. ही ढेकळे सुकलेला गाळ नाल्यातच साचून राहिल्याने तयार झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गतवर्षी या नाल्यांची सफाई झाली तरी होती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
छोटय़ा नाल्यांच्या साफसफाईसाठी प्रशासनाने निविदा काढल्या होत्या. मात्र कंत्राटदारांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार फेरनिविदा काढल्यानंतरही कंत्राटदार कामे करण्यासाठी पुढे न आल्याने अखेर पालिकेच्या विभाग कार्यालयाच्या स्तरावर छोटय़ा नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला होता. या नाल्यांतून सुमारे १.६७ लाख मे. टन गाळ काढण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन १.६४ लाख दिवस कामगारश्रम (मॅनडेज) उपलब्ध करुन छोटय़ा नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मुंबईमधील छोटय़ा नाल्यांच्या सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नाल्यांमध्ये साचलेल्या गाळाची टणक ढेकळांमध्ये रूपांतर झाले आहे. ही ढेकळे फोडून बाहेर काढावी लागत आहेत. दरवर्षी नियमितपणे पावसाळ्यापूर्वी गाळ उपसण्यात येत होता, मग गाळाची ढेकळे कशी काय झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकूणच गतवर्षीच्या आणि त्याआधीच्या नालेसफाईभोवती संशयाचे धुके आहे.
छोटय़ा नाल्यांतून उपसलेला तब्बल ३५ हजार मे. टन गाळ मुंबईबाहेर वाहून नेण्यात आला आहे. उपसलेला गाळ नाल्याकाठी सुकल्यानंतर तो वाहून नेला जातो. त्यामुळे त्याचे वजनही कमी होते. म्हणजे नाल्यांतून अंदाजे ७० मे. टन ओला गाळ उपसल्याचा दावा काही अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. येत्या तीन-चार दिवसांमध्ये छोटय़ा नाल्यांतील आणखी सुमारे १० हजार मे. टन सुकलेला गाळ मुंबईबाहेरील कचराभूमीकडे वाहून नेण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. म्हणजे एकूण सुमारे ९० हजार मे. टनाच्या आसपास गाळ उपसण्यात येईल अशी शक्यता काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उपसलेल्या गाळाचे प्रमाण कमी आहे.

वाहून नेणाऱ्या ट्रकचा तुटवडा
यंदा छोटय़ा नाल्यांमधील गाळ वाहून नेण्यासाठी पालिकेला ट्रकचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा भासत आहे. गाळ वाहून नेण्यासाठी पालिकेला जेमतेम ३०० ट्रक उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये १५ टनाहून अधिक गाळ वाहून नेण्यासाठी जेमतेम ६० ट्रक पालिकेला उपलब्ध झाले आहेत. मात्र गेल्या वर्षी कंत्राटदारांना मुबलक ट्रक मिळाले होते. हे ट्रक आले कुठून असा आणखी एक प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून गेल्या वर्षी नाल्यातील गाळ वाहून नेण्यासाठी वापरलेल्या ट्रकच्या संख्येबाबतही संशयाची पाल चुकचुकत आहे.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !