कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात किंवा गृह खात्यावर जरब बसविण्यात गृहमंत्री आर. आर. पाटील कमी पडत असल्याची भावना काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या गोटातही निर्माण झाली आहे. आबांच्या गृह खात्याच्या कारभारावरून काँग्रेस किंवा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फारसे समाधानी नसतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तसाच सूर लावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या, महिला छायाचित्रकारावर झालेला बलात्कार, मुंबई उपनगरीय गाडीत विदेशी महिलेवर झालेला हल्ला, ठिकठिकाणी वाळू माफियांकडून शासकीय अधिकाऱ्यांवर होणारे राजरोस हल्ले, काही पोलीस अधिकाऱ्यांची वाढती मग्रुरी यातून कायदा आणि सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले. पोलीस दलाचा दरारा किंवा वचकच उरलेला नसल्याचा संदेश जाणे हे राज्यासाठी केव्हाही चुकीचे आहे. गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांना या प्रकरणी दोष देता येणार नसला तरी खात्यावर प्रभाव निर्माण करण्यात त्यांना गेल्या काही दिवसांमध्ये अपयश आल्याचे बोलले जाते.
आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेचा राष्ट्रवादीला राजकीय लाभ होत असला तरी बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला तापदायक ठरू शकते, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. गृह खात्याच्या कारभारावरून मुख्यमंत्री अजिबात समाधानी नाहीत. यंदा तर मुख्यमंत्री अणि गृहमंत्र्यांच्या वादातून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नाहीत. राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. आर. आर. यांच्या गृह खात्याने शिफारस केलेल्या नावांवर मुख्यमंत्र्यांनी काट मारली होती. परिणामी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या वादात हस्तक्षेप करावा लागला होता. राज्यातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रफुल्ल पटेल हे सुद्धा फारसे समाधानी नाहीत. पुण्यातील बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गृह खात्याच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करीत आर. आर. पाटील यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला होता.
आबांची खात्यावरील पकड सैलावली
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात किंवा गृह खात्यावर जरब बसविण्यात गृहमंत्री आर. आर. पाटील कमी पडत असल्याची भावना काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या
First published on: 25-08-2013 at 01:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R r patil losing hold of his ministry