मुंबई: राज्यातील रब्बी हंगामातील कांदा लागवड क्षेत्र सरासरी साडेचार लाख हेक्टर आहे. यंदा लागवड क्षेत्रात एक लाख हेक्टरने वाढ होऊन रब्बीतील एकूण लागवड साडेपाच लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे.

पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे आणि रब्बीसाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्यामुळे लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज आहे. रब्बी हंगामात दरवर्षी सुमारे साडेचार लाख हेक्टरवर कांदा लागवड होते. यंदा त्यात सुमारे एक लाख हेक्टरने वाढ होऊन सुमारे साडेपाच लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे.

Agriculture Department prepared for Rabi season in district preparing agriculture in Konkan region for second time after paddy harvest
जिल्ह्यात ५ हजार ६८२ हेक्टरवर रब्बीचे नियोजन, २ हजार ९४० हेक्टरवर कडधान्यांची लागवड
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?

हेही वाचा >>>मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी

देशाच्या पातळीवरही रब्बी हंगामातील क्षेत्रात ८ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. देशात एका वर्षात विविध हंगामात मिळून १०.८३ लाख हेक्टरवर लागवड होते, त्यात यंदा ८ ते १० टक्क्यांनी वाढ होऊन एकूण कांदा लागवड क्षेत्र १२ ते १३ लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे. राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्राचे प्रमुख विजय महाजन यांनी ही लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रब्बीसाठी बाजारात बियाणांना मागणी जास्त होती. बाजारातील बियाणे संपले आहेत. त्यामुळे लागवड क्षेत्रात चांगली वाढ होण्याचा अंदाज असल्याचे महाजन म्हणाले.

नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामातही कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले होते. गेल्या वर्षी देशभरात खरिपात ३.८ लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यंदा त्यात एक लाख हेक्टरने वाढ झाली होती. खरीप कांद्याला काढणीच्या काळात अतिवृष्टीचा फटका बसला होता. कांद्याचे नुकसान झाले होते, तरीही लागवड क्षेत्रात झाल्यामुळे मार्चअखेरपर्यंत कांद्याची उपलब्धता चांगली राहील.

हेही वाचा >>>दादर-माहीम मतदारसंघ: मूलभूत आणि पायाभूत सुविधांवर भर

कांदा लागवड पंधरा दिवसांनी लांबली

नाशिक परिसरात कांदा लागवडीसाठी तयार केलेली रोप मुसळधार पावसामुळे वाया गेली आहेत. त्यामुळे लागवडीसाठी कांदा रोपांचा तुटवडा जाणवत आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा रोपवाटिका टाकल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी थेट कांदा बियांची पेरणी करण्याचा मार्ग स्विकारला आहे. रोपे खराब झाल्याचा परिणाम म्हणून हंगाम १५ दिवसांनी लांबणीवर गेला आहे. बाजारात कांद्याची रोपे शिल्लक नाहीत. कांदा बियाणांचे दर २२०० ते २४०० किलोंवर गेले आहेत, अशी माहिती सिन्नर येथील कांदा उत्पादक शेतकरी अमोल मुळे यांनी दिली.

मार्चपर्यंत खरीप कांदा पुरेल

यंदा देशभरात खरीप कांद्याच्या लागवडीत वाढ झाली होती. रब्बी हंगामातही लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज आहे. देशपातळीवरील लागवड क्षेत्रात सुमारे दहा टक्क्यांनी, राज्यात सुमारे २० टक्क्यांनी लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. खरीप कांद्याची बाजारातील आवक हळूहळू वाढेल, मार्चपर्यंत हा कांदा पुरेल, असे मत शेतीमालाच्या बाजार व्यवस्थेचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

Story img Loader