मुंबई : मुंबई महानगरपालिकेने जागतिक रेबीज दिनानिमित्त २८ सप्टेंबर म्हणजेच आजपासून संपूर्ण मुंबईतील भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंध लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून पालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या श्वानांची माहिती नोंदवण्यासाठी यंदा ऑनलाइन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या ऑनलाइन ॲप्लिकेशनमध्ये संबंधित श्वानाची आकडेवारी छायाचित्रासह उपलब्ध असेल.

हेही वाचा >>> वांद्रे येथील व्यावसायिकाची ६ कोटींची फसवणूक; सनदी लेखापालासह कर्नाटकात राहणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
rte admissions process
आरटीईमध्ये प्रवेश हवा, मग ही माहिती जाणून घ्या… ‘या’ तारखेपासून प्रक्रिया…
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून

प्राणी कल्याण तसेच, प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव, तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’च्या उद्देशाने संपूर्ण मुंबईत रेबीज प्रतिबंध लसीकरणाचा आणखी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेबीज या प्राणघातक रोगासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाचे आयोजन केले जाते.

हेही वाचा >>> Mumbai University Senate Election 2024 Result: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत उबाठा गटाच्या युवा सेनेचा डंका, अभाविपला धक्का

‘रेबीजचे सीमोल्लंघन’ ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाची संकल्पना आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागातर्फे यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, यूनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन या संघटनांच्या सहकार्याने रेबीज प्रतिबंध लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेला शनिवार, २८ सप्टेंबरपासून सुरुवात होत असून साधारणपणे मार्च २०२५ पर्यंत मोहीम सुरू राहील. २०१४ च्या आकडेवारीनुसार, मुंबईत सुमारे ८७ हजार भटके श्वान आहेत. या आकडेवारीसह दरम्यानच्या काळात वाढलेले भटके श्वान आदींचे या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यात आलेल्या भटक्या श्वानाला चिन्हांकित केले जाईल. तसेच, त्यांची संपूर्ण माहिती छायाचित्रांसह https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या संकेतस्थळावर नोंदवण्यात येईल. त्यामुळे लसीकरणासंदर्भात वास्तविक माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

Story img Loader