‘ललित दोशी मेमोरिअल फाऊंडेशन’तर्फे सोमवार ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ‘रिझव्र्ह बँके’चे गव्हर्नर रघुराम राजन यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच या वेळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने लघु-मध्यम उद्योजकांना ललित दोशी स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘ललित दोशी मेमोरिअल फाऊंडेशन’ आणि ‘एमआयडीसी’तर्फे अमरावतीमधील ‘जाधव गिअर प्रा. लि.’ आणि अकोला येथील ‘अक्षय केमिकल्स’ या उद्योगांना ललित दोशी स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर ‘फायनान्शिअल सेक्टर रिफॉम्र्स-अॅचिव्हमेंट, प्रॉस्पेक्ट्स अॅण्ड चॅलेंजेस’ या विषयावर रघुराम राजन यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा