मुंबई : लोअर परळ येथील रघुवंशी मिलमधील एका कार्यालयाला शुक्रवारी संध्याकाळी लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला रात्री उशिरा यश आले. वरळीतील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दलाच्या वाहनांचा ताफा घटनास्थळी वेळेत पोहोचू शकल्या नाही. त्यामुळे मदत कार्याला विलंब झाल्याचे स्पष्ट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेनापती बापट मार्गावरील रघुवंशी मिल संकुलातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र वाहतूक कोंडीमुळे या गाडय़ांना घटनास्थळी पोहोचण्यास १५ ते २० मिनिटे विलंब झाला. दरम्यान, या इमारतींना काचेची तावदाने असल्यामुळे आग खूप पसरल्याचे दिसत होते. त्यामुळे आगीचा स्तर तीन असल्याचे अग्निशमन दलाने घोषित केले. रघुवंशी मिल परिसरात काही महिन्यांच्या अंतराने आगीच्या घटना घडत असल्याने येथील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghuvanshi mill fire tragedy firefighters frustrated due to traffic congestion amy