Rahul Gandhi in Mumbai Live Updates Dharavi Redevelopment : मुंबईतील धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून चालू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने (ठाकरे) हा विषय लावून धरलेला असतानाच आता राहुल गांधी देखील यामध्ये सहभागी होत आहेत. आज (गुरुवार, ६ मार्च) ते मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत ते धारावीला भेट देतील आणि तिथल्या मजुरांशी, व्यावसायिकांशी संवाद साधतील. देशातील अनेक उद्योगधंद्यांची कंत्राटं अदाणी समूहाला देण्यात आली आहेत. अनेक उद्योग हे व्यावसायिक गौतम अदाणींच्या ताब्यात दिले आहेत. यावरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अदाणींच्या मार्फत केंद्र सरकार देशाची संपत्ती लुटत असल्याचा आरोप करत आहेत. अशातच धारावी पुनर्वसन प्रकल्पाचं कंत्राट अदानी समूहाला देण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून आधीच राज्यातील महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा