कॉंग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या राहुल गांधी यांच्या गाड्यांच्या ताफ्यामुळे शुक्रवारी रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रदेश नेतृत्त्वाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी मुंबईच्या दौऱयावर आले आहेत.
टिळक भवनमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश हे आहेत. मुंबईतील सर्व मतदारसंघातील पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक, संघटनात्मक प्रमुख हे बैठकीला उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांच्या गाड्या आणि राहुल गांधी यांच्या गाड्यांचा ताफा यामुळे सामान्य मुंबईकर शुक्रवारी काही वेळ वेठीस धरला गेला. ट्रॅफीक जामचा त्याला सामना करावा लागला.

Story img Loader