अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवारांसह मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या याचिकेबाबत राहुल नार्वेकर यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (३ जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल नार्वेकर म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ९ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सादर केली आहे. मला ती याचिका मिळाली आहे. त्या याचिकेत नेमकं काय म्हटलं आहे हे पूर्ण वाचल्यानंतर मी त्यावर निर्णय घेईन.”

हेही वाचा : “अजित पवार शिंदे-फडणवीसांबरोबर जातील याचा अंदाज…”, राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवारांचं मोठं विधान

अजित पवारांना किती आमदारांचा पाठिंबा?

अजित पवारांना किती आमदारांचं पाठबळ आहे? असा प्रश्न विचारला असता राहुल नार्वेकर म्हणाले, “अजित पवारांना किती आमदारांचं पाठबळ आहे याविषयी मला अद्याप कोणतीही माहिती नाही.”

हेही वाचा : VIDEO: “अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादीबरोबर…”, फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसचा हल्लाबोल

काँग्रेस की राष्ट्रवादी, विरोधी पक्षनेतेपद कुणाला देणार?

काँग्रेस मोठा पक्ष, राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र, काय निर्णय घेणार? या प्रश्नावर नार्वेकर म्हणाले, “सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाला मान्यता विधानसभा अध्यक्ष देतात. तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. या अधिकारांचा वापर करताना विधानसभा अध्यक्षांना विधानसभेच्या नियमांचा व संवैधानिक तरतुदींचा विचार करून योग्य निर्णय घेणं अपेक्षित असतं.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul narvekar comment on jayant patil demand to disqualify ajit pawar 9 mla pbs