शिवसेनेच्या ठाकरे गटाने बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिरंगाई न करता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर शुक्रवारी (१४ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना नोटीस बजावत न्यायालयात दाखल प्रकरणावर दोन आठवड्यात म्हणणं मांडण्यास सांगितलं. आता या नोटीसबाबत राहुल नार्वेकरांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल नार्वेकर म्हणाले, “मला माध्यमांमधून समजलं की, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात दाखल याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.”

“माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही”

“माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे नोटीसचा संपूर्ण अभ्यास करून मी यावर पुढील निर्णय घेईन,” असं मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : अन्न व नागरी पुरवठा खातं मिळाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमदारांना दिलेल्या नोटीसवर उत्तरं आली का?

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी अपात्रतेबाबत शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती. त्या नोटीसवर शिंदे गटाच्या आमदारांनी उत्तरं दिली का? असा प्रश्न विचारला असता राहुल नार्वेकर म्हणाले, “याबाबत विधीमंडळ सचिवालयाकडून माहिती घ्यावी लागेल.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul narwekar first comment on supreme court notice over shinde faction mla disqualification pbs
Show comments