शिंदे गटाचे नेते तथा खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने काही महिन्यांपूर्वी साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. या महिलेने शेवाळे यांनी अत्याचार केल्याचा दावा केला आहे. याच तक्रारीचा आधार घेत विरोधकांकडून शेवाळे यांना लक्ष्य केलं जातंय. तक्रारदार महिलेला मुंबईत येऊ दिले जात नसून तिला संरक्षण द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. या सर्व प्रकारानंतर शेवाळे यांनी आज (२५ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपूर्ण कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या महिलेला मी करोना काळात मदत केली होती. मात्र नंतर या महिलेच्या अपेक्षा वाढत गेल्या. या महिलेने नंतर मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, असा दावाही शेवाळे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचं बीज मीच पेरलं”; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मविआ स्थापन झाल्यानंतर…”

“माझा संसार कसा खराब होईल तसेच माझे राजकीय आयुष्य कसे नष्ट होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेची आई दिल्लीमध्ये कॅब्रे डान्सर होती. त्या महिलेच्या वडिलांचा गुन्हेगारी इतिहास आहे. याबाबत दिल्ली पोलीस ठाण्यात माहिती उपलब्ध आहे. या महिलेचा एक भाऊ तुरुंगात आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात तो तुरुंगवास भोगत आहे. या महिलेचा दुसरा भाऊ ड्रग्ज तस्करी करतो. या महिलेची बहीण माहीम येथे बार गर्लचं काम करते. माझ्यावर तक्रार करणाऱ्या महिलेच्या पूर्ण कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास आहे. या माहितीला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला आहे,” अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

हेही वाचा >>> “अयोध्येत लवकरच उभारलं जाणार महाराष्ट्र भवन”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

“या महिलेला आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे माझ्या दुबईच्या रेहमान या मित्राने मला या महिलेला मदत करण्यास सांगितले होते. ही महिला करोनाकाळात भारतात अडकली होती. त्यामुळे तिला मदत करावी असे मला रेहमानने सांगितले होते. करोना काळात मी अनेकांना मदत केली. त्याचप्रमाणे मी या महिलेलाही मदत केली. मात्र नंतरच्या काळात या महिलेची अपेक्षा वाढत गेली. या महिलेने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जेव्हा मी पैसे देण्याचे थांबवले तेव्हा या महिलेने खोटे फोटो दाखवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला,” असा दावा राहुल शेवाळे यांनी केला.

हेही वाचा >>> दिशा सालियनच्या वडिलांना माध्यमांशी बोलू न दिल्याचा आरोप, संजय राऊत म्हणाले, “सुपारीबाज लोक…”

“सप्टेंबर २०२१ मध्ये तिच्या भावाने एक खून केला. या खुनामागे माझ्याविरोधात तक्रार करणारी महिला आहे, असे खून झालेल्या माणसाच्या पत्नीने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी कोर्टालाही तशी माहिती दिली होती. त्यानंतर ही महिला दुबईला पळून गेली. दुबईतून ट्विटर, इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करून या महिलेने मला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. मी वांद्रे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. मुंबई पोलीस, दिल्ली पोलिसांनी या फेक अकाऊंटचा तपास केलेला आहे. या तपासानुसार दुबईमधून हे अकाऊंट चालवले जात होते,” असे शेवाळे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेट” अमोल मिटकरींनी ट्विट केलेला तो व्हिडिओ आमदार निवासातला नसल्याचं स्पष्टीकरण

“मी दुबई पोलिसातही तक्रार केली होती. दुबई पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास केला होता. या तपासानुसार ही महिला पाकिस्तान एजंटच्या माध्यमातून हे फेक अकाऊंट्स चालवत होती. त्यानंतर दुबई पोलिसांनी या महिलेला अटक केली होती. ही महिला ८२ दिवस तुरुंगात होती. शारजाह आणि युएईच्या कोर्टाने या महिलेला ५० दिरहमचा दंड ठोठावला होता. तसेच या महिलेची देशातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता,” असे शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या निकालानंतर मधल्या काळात ही महिला गायब होती. नंतर अचानक एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा या महिलेने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली,” असा दावा शेवाळे यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul shewale case denies allegations made by women and women blackmail me showing fake photo prd