सेफ डिपॉझिट व्हॉल्टची खाजगी सेवा देणाऱ्या संस्थांच्या कार्यालयांवर छापे घालून प्राप्तिकर विभागाने पाच कोटी रुपये रोख जप्त केली. झवेरी बाजारात कार्यरत असलेल्या छोटय़ा स्वरूपाच्या सोने व्यापाऱ्यांना सेफ व्हॉल्टची खाजगी सेवा देणाऱ्या संस्थांच्या कार्यालयांवर गेल्या काही दिवसात प्राप्तिकर विभागाने छापे घातले. यामार्फत हवालामार्फत होणारे पैशांचे व्यवहार उघडकीस यावेत म्हणून प्राप्तिकर विभागाने छापे घालण्यात येत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली.या छाप्यांमधून आतापर्यंत ५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आमच्या विभागातर्फे दरवर्षी झवेरी बाजारा असे छापे घातले जातात, अशी माहितीही सूत्रांनी दिली. हवालामार्फत पैशांचे व्यवहार करण्यासाठी खाजगी सेफ डिपॉझिट व्हॉल्ट सेवेचा उपयोग केला जातो का याची तपासणी करणे हा छापे घालण्यामागचा उद्देश आहे. सेफ डिपॉझिट व्हॉल्टची सेवा देणाऱ्या ३४ पुरवठादारांच्या कार्यालयांवर छापे घालण्यात आले असून या सेवेच वापर करणाऱ्या सोने व्यापाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

Story img Loader