मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने शहरात अनधिकृतपणे चालणाऱ्या लॉटरी अड्डय़ांवर छापे घालून ते उद्ध्वस्त केले. गुरुवारी रात्री तीन ठिकाणी घातलेल्या छाप्यात ३१ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून साडेचारलाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर लॉटरी सेंटरवर छापा घालून १० जणांना अटक करण्यात आली. तेथून ३ लाखांची लॉटरीची स्क्रॅच तिकिटे तसेच १ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. तर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारसमणी आणि सिद्दीविनायक या दोन लॉटरी सेंटरवर छापे घालून १९ जणांना अटक केली. या सर्वावर जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आले.

Story img Loader