मुंबई : गोवंडी रेल्वे स्थानकात डाउन मार्गावरील रुळाला बुधवारी सकाळी ७.५० च्या सुमारास तडा गेला. त्यामुळे वाशीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुळाला तडा गेल्याचे समजताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती कामे हाती घेतले. दुरुस्तीचे काम 40 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आले. त्यामुळे वाशीच्या दिशने जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. सीएसएमटी स्थानकात मंगळवारी सकाळी लोकल गाडीचा एक डबा रुळावरून घसरल्यामुळे हार्बरवरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rail track fracture at govandi station harbour local services disturbed mumbai print news asj