Mumbai Local Train Mega Block मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. तर, ट्रान्स हार्बर मार्ग आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. तसेच पश्चिम रेल्वेवर रविवारऐवजी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल.
हेही वाचा >>> मुंबईः बेबी पाटणकर विरोधात गुन्हा दाखल; व्यापाऱ्याची दोन कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
मध्य रेल्वे
कुठे : ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत मुलुंडहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण – मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील. पुढे त्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.
हेही वाचा >>> करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण : सुजीत पाटकरसह सहा जणांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
पश्चिम रेल्वे
कुठे : गोरेगाव आणि सांताक्रूझ अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरील लोकल डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर अप धीम्या मार्गावरील लोकल अंधेरी – खार रोड स्थानकांदरम्यान अप हार्बर मार्गावर चालवण्यात येतील. ब्लाॅकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.