मुंबई : विविध अभियांत्रिकी कामे, रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि इतर उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : ठाणे – दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर

कधी : रविवारी सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत

परिणाम : सकाळी ९.४६ सीएसएमटी – बदलापूर, सकाळी १०.२८ सीएसएमटी – अंबरनाथ, दुपारी २.४२ सीएसएमटी – आसनगाव, दुपारी ३.१७ कल्याण – सीएसएमटी दरम्यान जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा, दिवा येथे थांबतील. सकाळी ९.५० वाजताची वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.४५ वाजताची दिवा – वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. दुपारी १२.५५ वाजता वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. दुपारी २.४५ वाजता दिवा – वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. रत्नागिरी – दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.

हेही वाचा – मुंबई : शॅम्पूच्या बाटलीत सापडले २० कोटींचे कोकेन, परदेशी महिलेला अटक

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी – कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

हेही वाचा – मतदार यादीसोबत मतदारांचा मोबाइल क्रमांक जोडणार, ‘या’ तारखेपर्यंत नव मतदारांना अद्ययावतीकरण करता येणार

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल रद्द करण्यात येतील. तर, हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway block news sunday block on central western railway mumbai print news ssb