भायखळा रेल्वे स्थानकानजीक असलेली संरक्षक भिंत कोसळून एक महिला ठार झाली़  तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
भायखळा रेल्वेस्थानकाबाहेर एन. एम. जोशी मार्गावर रेल्वेने संरक्षक िभत बांधली होती. अनेक जण या भिंतीचा आश्रय घेऊन झोपडय़ा बांधून बेकायदा राहात होते. गुरुवारी दुपारी अचानक ही भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली काही रहिवाशी अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा उपसून जखमींना बाहेर काढले. मात्र अपघातात नसीब उल अन्सारी (२२) या तरुणीचा मृत्यू झाला, तर मुस्तफा शेख (५०) आणि रियाज शेख (३०) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.    

Story img Loader