कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने हार्बर मार्गावरील दोन्ही दिशेची उपनगरी वाहतूक सोमवारी सकाळी तब्बल दीड तास ठप्प झाली होती.
मुंबई पोर्ट ट्रस्टमधून कोळसा घेऊन डहाणू येथील विद्युत केंद्राकडे निघालेल्या मालगाडीचे इंजिन पहाटे साडेपाचच्या सुमारास सांधा बदलत असताना अचानक जागीच थांबले. कुर्ला आणि चुनाभट्टीच्या दरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गाच्या मध्येच ही मालगाडी उभी असल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद पडली. गाडय़ा कशामुळे बंद आहेत, हे न कळल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी मार्गातच थांबलेल्या गाडय़ांमधून खाली उतरून कुर्ला स्थानकाकडे पायी जाणे पसंत केले. कुर्ला स्थानकात सव्वासहा वाजल्यानंतर प्रवाशांना मेन लाइनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात येत होते. सात वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या इंजिनाच्या साहाय्याने मालगाडी हलविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरू झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा