महिला प्रवाशांनी रविवारी सुटी असल्याने एक दिवस आधीच महिला दिन दणक्यात साजरा केला. रेल्वे mu01प्रवासी सहकारी मित्र संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींना गुलाब पुष्प देऊन फलाट क्र. १वर स्वागत केले. लोकल ट्रेनच्या मोटरमननाही त्यांनी पुष्पगुच्छ दिला. मोटरमनच्या सेवेबद्दल महिलांनी आभार मानले. या वेळी महिलांनी फुगडय़ा घालून व गाणे म्हणून महिला दिन साजरा केला.

Story img Loader