महाविद्यालयातून आपल्या मित्रांसोबत घरी निघालेल्या विद्यार्थ्यांचा रेल्वे मार्गातून चालताना रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ घडली.वांद्रे येथे राहणारा अल्पेश परमार (१९) सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून मंगळवारी तो आपल्या दोन मित्रांसोबत दुपारी १२.३० च्या सुमारास घरी निघाला होता.
चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गातून गप्पा मारत हे तिघे जात होते. त्यावेळी सीएसटीला जाणाऱ्या रेल्वेची अल्पेशला धडक बसली. त्याच्या डोक्याला आणि पायाला जखम झाली. तात्काळ त्याला शीव रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Story img Loader